या दिवाळीला सात वर्षांनी जुळून आलाय हा ‘शुभ’ योग !

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन – रांगोळी, फराळ आणि घरभर रोषणाई अशी आेळख असणारा दिवाळीचा सण काही दिवसांवरच आला आहे. तज्ज्ञांनुसार यावेळी दिवाळीवर ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे ७ वर्षांनंतर एक खास योग जुळून आला आहे. यंदा ७ नोव्हेंबरला कार्तिक कृष्ण अमावस्येला दिवाळी उत्सव साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे असे मानले जात आहे की, ७ वर्षांनंतर जुळून आलेला हा खास योग सर्वांसाठी सुख-समृद्धी घेऊन येणारा ठरणार आहे.

७ तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी शुभदिवस ठरणार
तज्ज्ञांनुसार, यावेळी ७ वी राशी तूळ ७ वर्षांनी सूर्य, शुक्र आणि चंद्र या तीन ग्रहांसोबत एकत्र येणार आहे. योगायोगाची बाब म्हणजे दिवाळी सुद्धा ७ तारखेला साजरी केली जाणार आहे. त्यामुळे हा दिवस ७ तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी फार शुभ मानला जात आहे.

दिवाळी शुभ मुहूर्त
७ तारखेला लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांपासून ते ८ वाजून २० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर व्यापाऱ्यांसाठी पूजेचा मुहूर्त सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांपासून ते ७ वाजून ५० मिनिटांपर्यत असणार आहे.

धनत्रयोदशी शुभ मुहूर्त
५ नोव्हेंबर २०१८ ला धनत्रयोदशी साजरी केली जाणार. या दिवशी पूजेसाठी सायंकाळी ६.०५ वाजेपासून ते ८.०१ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असेल. शुभ मुहूर्ताचा कालावधी १ तास ५५ मिनिटांचा असेल. तर या दिवशी खरेदी करण्याचा मुहूर्त सकाळी ७ वाजेपासून ते ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत, दुपारी १ वाजेपासून ते २ वाजून ३० मिनिटांपर्यंत तर सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते ७ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

लक्ष्मीपूजन थोडक्यात
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे. संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

धनत्रयोदशी थोडक्यात
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

जाहिरात