डीके शिवकुमारांच्या ‘केस’मध्ये पी चिदंबरम यांचा ‘संदर्भ’, ‘कॉपी पेस्ट’मुळं सुप्रीम कोर्टानं ED ला ‘झापलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला असून जामीन रद्द करण्याची ईडीने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

यावेळी सुनावणी करताना कोर्टाने ईडीला फाटकारताना म्हटले कि, तुमच्या अधिकाऱ्यांना निर्णयाची प्रत नीट वाचण्यास सांगा. आमच्या निर्णयांना तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाहीत. तुम्ही या खटल्यात पी. चिदंबरम यांचे आरोप करत असून ते संपूर्णपणे जसेच्या तसे आहेत. यामध्ये एका शब्दाचाही बदल करण्यात आलेला नाही. तसेच ईडीने डीके शिवकुमार यांच्यावर दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश देखील कोर्टाने ईडीला दिले आहेत.

देशातील मोठया तपास यंत्रणेकडून अशा पध्दतीनं काम केलं जात असल्यानं सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. ईडीकडे अनेक महत्वपुर्ण प्रकरणाचे तपास आहेत. आयएनएक्स मिडीया प्रकरण, रॉबर्ट वाड्रा यांचे प्रकरण, डी शिवकुमारांसह इतर अनेक महत्वांच्या प्रकरणावर सध्या ईडीकडून तपास सुरू आहे. त्यातच अशा प्रकारची कॉपी पेस्टची घोडचूक झाल्यानं सुप्रीम कोर्टानं ईडीला झापलं आहे.

Visit : Policenama.com