शरद पवारांचा उमेदवार म्हणून ये मग आम्ही पाहू : उद्धव ठाकरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदार संघात प्रत्येक पक्षाचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी सभा घेत आहे. आज शिरुर मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या आणि राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार यांच्यावर निशाणा साधला. शिवाजी महाराजांचे काम करणारा म्हणून नाही, तर शरद पवारांचा उमेदवार म्हणून ये मग आम्ही पाहू असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आमची युती ही शेतकऱ्यांसाठी आणि तुमच्यासाठी झालेली आहे. जाहिरातीमधून लाज वाटते का ? असे आम्हाला विचारणारे यांचा कधी लाजेशी संबंध आला आहे का ? जनतेसमोर मतं मागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असे अमोल कोल्हे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, खासदार हा तुमच्यासोबत राहून काम करणारा पाहिजे की नाटकात काम करणारा पाहिजे. नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधान आहेत. पण त्यांच्याकडे एकही नाव नाही. काँग्रेस आघाडीकडे बुडबुडे भरपूर आहेत, पण पंतप्रधानपदाचा चेहरा एकही नाही. मागील पन्नास वर्षात आम्ही भगवा बदलला, ना नेता बदलला. माझ्या मातेशी आणि मातीशी इमान राखणारा भगवा खांद्यावर घेतला आहे, असे म्हणत शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग त्यांनी यावेळी सांगितला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले, गेल्यावेळी धरण कोरडी पडली होती, त्या धरणात आम्ही काय…? तुम्हाला पटत असेल तर जरूर धरण भरून घ्या. दुष्काळ पडला तर त्या माणसाला धरणाच्या आसपासही फिरकू देऊ नका. सावध रहा. असे अजित पवार यांचे नाव न घेता पवारांच्या त्या वक्तव्याची आठवण करून दिली.

Loading...
You might also like