Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्याचे ‘हे’ 5 प्रभावी उपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व देशातील वैज्ञानिक या प्राणघातक व्हायरसचा उपाय शोधण्यात व्यस्त आहे. त्याचबरोबर या रोगापासून बचाव करण्यासाठी सगळीकडे लॉकडाऊनही करण्यात आले आहे. तसेच सर्वांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत की, या प्राणघातक व्हायरस संक्रमणाला रोखण्यासाठी कोणते प्रभावी उपाय आहे.

WHO च्या म्हणण्यानुसार, या व्हारसच्या प्रसाराला रोखण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे याची सुरुवात. ती समजणे गरजेचे आहे.

संक्रमित झालेल्या रुग्णांना एकांतात ठेवले पाहिजे. असे केल्याने कोरोना प्रसार रोखण्यास मदत होते. एवढेच नाही तर याच्या नवीन प्रकरणाची ओळख होण्यासही मदत होते.

तयारी आणि त्वरित कारवाई
मोठ्या स्तरावर संक्रमण पसरण्याच्या आधी हे रोखण्यासाठी त्वरित पाऊल उचलले पाहिजे.

सोशल डिस्टैसिंग
जर एखाद्या ठिकाणी गर्दी असेल तर व्यक्तीने एकमेकांमध्ये कमीतकमी ६ फुट अंतर ठेवणे गरजेचे आहे. कोणाच्या घरी जाऊ नये. कोणाच्या कार्यक्रमामध्ये देखील जाणे टाळावे. जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊ नये.

साफ सफाईसाठी जागृकता निर्माण करणे
WHO च्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी नियमितपणे हात धुणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण आपल्या आजुबाजुला स्वच्छता ठेवणे गरचेचे आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like