डॉक्टर असो की रूग्ण, सर्वांना ‘कोरोना’च्या संक्रमणापासून वाचवतेय ‘टेलिमेडिसीन’, जाणून घ्या कशी ठरतीय ‘मदतगार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संक्रमणाचा धोका सतत वाढत आहे. इतर आजार असलेले लोक देखील संसर्गाच्या भीतीमुळे रुग्णालयात येण्यास घाबरत आहेत, तर डॉक्टरांना देखील स्वत:ला संसर्ग होण्याची भीती वाटत आहे.

अशावेळी टेलीमेडिसिन एक चांगला पर्याय निर्माण झाला आहे. लोक रुग्णालयात न येताच फोनवर डॉक्टरांशी सल्लामसलत करत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना संसर्गाचा धोका खूप काळापर्यंत संपणार नाही आणि अशा काळात टेलिमेडिसिन प्रक्रिया खूप लोकप्रिय होऊ शकते.

मेट्रो हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर अमित कुमार पांडे यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळात ते सतत टेलीमेडिसिनद्वारे लोकांवर उपचार करत आहेत.

फोनवर लोक त्यांच्या समस्या आणि रोगाशी संबंधित लक्षणे सांगतात आणि ते त्यांना त्यासंबंधित औषध सांगतात. आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉलद्वारेही लोकांची शारीरिक स्थिती पाहतात. यामुळे रुग्णाची स्थिती समजून घेण्यात मदत होते.

टेलिमेडिसिनद्वारे कोरोनाग्रस्तांचे उपचार
संजय गुप्ता (४७ वर्षे) हे दिल्लीच्या सब्जी मंडी भागात राहतात. १२ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाशी संबंधित लक्षणे आढळली होती. त्यांना हलका ताप आणि खोकला होता. त्यांनी दिल्ली सरकारच्या हेल्पलाईनशी संपर्क साधला.

यानंतर त्यांना हेल्पलाइनवरुन एका डॉक्टरांचा फोन आला. त्यांनी आपली लक्षणे सांगून उपचार सुरू केले. त्यांनी सांगितले की, तेव्हापासून दिल्ली सरकारचे डॉक्टर दररोज फोन करून त्यांची प्रकृती व लक्षणे जाणून घेतात आणि आवश्यक सल्ला देतात.

आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कमी गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांवरही अशाच प्रकारे उपचार सुरु आहेत. आवश्यकतेनुसार लोक औषधांचा सल्ला घेतात. विशेष परिस्थितीत त्यांचे सहकारी रूग्णांना औषधही पोचवत आहेत. त्यांनी सांगितले की, टेलीमेडिसिनद्वारे ते दररोज सुमारे ६०-७० कोरोना रूग्णांना सल्ला देत आहेत.

शस्त्रक्रियेपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांच्या मते, आपल्या देशात टेलिमेडिसिन सुविधा पहिल्या टप्प्यात आहे, तर पाश्चात्य देशांमध्ये ती फारच प्रचलित आहे, जेथे शस्त्रक्रियेच्या कठीण प्रक्रियेमध्येही टेलिमेडिसिनद्वारे तज्ञांचा सल्ला घेतला जातो.

म्हणजे अमेरिकेच्या एका भागात रूग्णाचे ऑपरेशन चालू असते, तर त्याच वेळी दुसर्‍या देशात बसलेले तज्ञ आपल्या सहकाऱ्यांना ऑपरेशन संबंधित आवश्यक सल्ला देत असतात.

शस्त्रक्रियेमध्ये रोबोटचा वापर जसजसा वाढत जाईल तसतशा तांत्रिक त्रुटी कमी होत आहेत. हेच कारण आहे की, आरोग्य क्षेत्रात रोबोटचा वापर वाढण्यासह टेलिमेडिसिनच्या वापराची शक्यता सतत वाढत आहे.

त्यांनी सांगितले की, कोरोना काळामुळे टेलिमेडिसिन हळूहळू आपल्या येथेही लोकप्रिय होत आहे. मात्र भारतीय स्वभावामुळे लोकांना अजूनही टेलीमेडिसिनच्या वापराबद्दल शंका आहे, पण तरीही ते लोकांची गरज बनत आहे. ते म्हणाले की, हे आगामी काळात खूप लोकप्रिय होऊ शकते.