चलनी नोटांमुळं कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरतं ? CAIT नं केंद्र सरकारला विचारलं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरतो. अशा परिस्थितीत प्रत्येकजण अन-टच गोष्टी आणि वैशिष्ठ्ये फॉलो करीत आहे. परंतु चलन नोट जी एका हातातून दुसरीकडे जाते, तेथे संसर्ग पसरण्याचा धोका असतो. डिजिटल ट्रान्झॅक्शनचा वाढता ट्रेंड असूनही अजूनही मोठ्या संख्येने लोक रोख नोटांमध्ये व्यवहार करतात.त्यात सर्वात मोठा धोका या व्यापाऱ्यांना आहे. त्यामुळे व्यापा-यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला चलन नोटाचा संसर्ग पसरतो की नाही, याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

या माहितीसाठी कॅटने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांना पत्र लिहिले आहे. पत्रात केंद्र सरकारला विचारण्यात आले आहे की, जर नोटद्वारे संक्रमण पसरत असेल तर ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील. आज बर्‍याच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अहवालांमध्ये असे दिसून येत आहे की कागदाच्या नोटांमधून संसर्ग पसरतो.

कॅटने 2015 नंतर झालेल्या तीन अभ्यास अहवालाचा हवाला देत मागितले उत्तर

कॅटचे अध्यक्ष बी.सी. भारतीया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी 2015 मध्ये किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनऊच्या अहवालाचा हवाला देऊन म्हटले की, नोट्स आणि नाण्यांद्वारे विषाणू, फंगस आणि बॅक्टेरिया पसरतात. 2016 मध्ये तामिळनाडूमध्ये केलेल्या अभ्यासात आढळले की, 86.4 टक्के चलनी नोटा बरेच आजार पसरवत आहेत. या नोटा डॉक्टर, बँक, बाजार, कत्तलखाने, विद्यार्थी आणि गृहिणींकडून गोळा करण्यात आल्या. 2016 मध्ये कर्नाटकात झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार 100,50,20 आणि 10 रुपयांच्या 100 नोटांपैकी 58 नोटा संक्रमित होत्या.

1 वर्षात नोटा चलनात 15% वाढ

आरबीआयने मार्च 2019 पर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 21,10,892 लाख कोटी रुपये बँक नोटा चलनात होते आणि मार्च 2020 पर्यंत 24,20,975 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढल्या. म्हणजेच, एका वर्षात सुमारे 15 टक्के उडी घेतली. तर मार्च 2018 पर्यंत 18,03,709 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात आल्या आहेत.