बारामतीमध्ये कलम 370 लागू आहे का ? : मुख्यमंत्र्यांचा ‘सवाल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (प्रसाद गोसावी) – भाजपची महाजनादेश यात्रा पुण्यात येण्याआधी बारामतीमध्ये गेली होती. त्यावेळी शरद पवार यांच्यावर टीका सुरु करताच संतप्त राष्ट्रवादी कार्य़कर्त्यांनी घोषणा सुरु केल्या. पोलीस कार्यकर्त्यांच्या दिशेने धावून गेल्याने पळापळ झाली. याबाबत आज पत्रकार परिषदेत विचारले असता, बारामतीमध्ये पवरांशिवाय कोणी सभा घ्यायची नाही का ? बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. राष्ट्रवादीने आमच्या गावात सभा घ्यावी, आम्ही त्यांना मदत करू असा खोचक टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुण्यात असून त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. बारामतीमध्ये केवळ पाच ते सात घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी सात लोकांवर पोलीस लाठीचार्ज करणार काय, असे म्हणत लाठीचार्ज झाल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपाचे फडणवीस यांनी खंडन केले आहे. दुसऱ्या पक्षाने बारामतीमध्ये सभा घेऊ नये, याला लोकशाही म्हणतात का ? असा सवाल करत त्यांनी आता राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू घसरत असल्याचा आरोप केला.

नवीन विमातळाच्या भूसंपदानाचे काम लवकरच
पुण्यासाठी नवीन विमानतळाच्या जागेचे भूसंपादनाचे काम लवकरच सुरु केले जाणार आहे. शहरात केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून 40 ते 45 हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरु आहेत. पुणे शहरासाठी समान पाणी पुरवठा योजना सुरु असून ती पूर्ण झाल्यास पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. मात्र, पुण्यात प्रतिमाणसी पाण्याचा वापर जास्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ज्यांच्या नाववर मते मागत होते ते आज आमच्याकडे
उदयनराजो भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे आम्हाला आनंद होत आहे. उदयनराजे राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्या पक्षातील नेत्यांना त्यांच्यातील दुर्गुन दिसत नव्हते. त्यांच्या नावावर मते मागितली जात होती. आता तेच आमच्या पक्षात आले आहेत. आमच्या पक्षात येताच त्यांचे दुर्गुन दिसू लागले आहेत. मात्र, पोटनिवडणुकीत उदयनराजे यांना पुन्हा प्रचंड मताधिक्यांनी नवडून आणू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेस पालकमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,जलसंपदा मंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीष बापट, खा. संजय काकडे, शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री आ. दिलीप कांबळे, आ. योगेश टिळेकर, आ. जगदीश मुळीक, आ. मेधा कुलकर्णी, पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या