अमेरिकेनं WHO शी तोडले संबंध, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली घोषणा, चीनबाबत केलं मोठं विधान

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबाबत (डब्ल्यूएचओ) मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, आज आम्ही डब्ल्यूएचओ सोबतचे संबंध तोडत आहोत.

ट्रम्प म्हणाले, 40 मिलियन डॉलर प्रति वर्ष देऊन सुद्धा डब्ल्यूएचओवर चीनचे नियंत्रण आहे. अमेरिका दरवर्षी तब्बल 450 मिलियन डॉलर देते. डब्ल्यूएचओ कोरोना रोखण्यास सुरूवातीच्या टप्प्यात अयशस्वी ठरली, आता सुधारण्याची गरज असल्याने आम्ही आज डब्ल्यूएचओशी असलेले संबंध तोडत आहोत.

ट्रम्प यांनी म्हटले की, ते डब्ल्यूएचओला देत असलेला निधी आता पब्लिक हेल्थसाठी काम करणार्‍या इतर संघटनेला देतील.

ट्रम्प यांनी म्हटले, अनेक वर्षांपासून चीन सरकारने आमची औद्योगिक रहस्य चोरण्यासाठी चुकीच्या पद्धतीने हेरगिरी केली आहे. आज मी आमच्या राष्ट्राच्या महत्वपूर्ण विश्व विद्यालयाला संशोधनासाठी चांगल्या पद्धतीने सुरक्षित करण्यासाठी एक घोषणा करेन आणि संभाव्य परदेशी जोखीम म्हणून ओळखल्या जाणार्‍या चीनच्या काही नागरिकांच्या प्रवेशावर प्रतिबंध लावेन.

ट्रम्प म्हणाले, हाँगकाँगविरूद्ध चीनी सरकारचे नवे पाऊल त्यांची विश्वासार्हता कमी करत आहे. ही हाँगकाँगच्या लोकांना, चीनच्या लोकांना आणि प्रत्यक्ष जगातील लोकांसाठी एक शोकांतिका आहे.

ट्रम्प यांनी म्हटले, चीनने आपल्या एक देश, दोन सिस्टम या आश्वासनाला एक देश, एक सिस्टममध्ये बदलले आहे. यासाठी आता मी माझ्या प्रशासनाला निर्देश देत आहे की, हाँगकाँगला वेगळी आणि स्पेशल ट्रीटमेंट देणाची नितीगत सूट संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू करावी.

ते म्हणाले, आम्ही हॉगकाँगसाठी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरीमध्ये दुरूस्ती करू. वुहान व्हायरस चीनच्या कव्हर-अपने या आजाराला संपूर्ण जगात पसरवण्याची परवानगी दिली, ज्यामुळे एक जागतिक महामारी निर्माण झाली, ज्यामुळे 1 लाखपेक्षा जास्त अमेरिकन लोक आणि जगभरात लाखो लोकांचा बळी गेला. चीनी अधिकार्‍यांनी डब्ल्यूएचओच्या बाबत आपल्या रिपोर्टिंगच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like