डोनाल्ड ट्रंप यांना ‘या’ पोर्न स्टारला द्यावे लागतील 33 लाख रुपये

वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका पोर्न स्टारला सुमारे 33 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. अमेरिकन न्यायालयाने हा आदेश दिला आहे. स्टॉर्मी डेनियल्स नावाच्या पोर्न स्टारचे म्हणणे आहे की, तिचे ट्रम्प यांच्यासोबत अफेयर होते. मात्र, ट्रम्प यांनी हे नाकारले होते.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, 41 वर्षांच्या स्टॉर्मी डेनियल्सने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला होता. तिचा खटला नंतर रद्द झाला. आता कोर्टाने म्हटले आहे की, खटल्या दरम्यान डेनियल्सचे जो खर्च झाला आहे, तो ट्रम्प यांना चुकवावा लागेल.

कॅलिफोर्नियाच्या कोर्टाने ट्रम्प यांना 33 लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. डेनियल्सच्या वकिलांनी कोर्टाच्या निर्णयाची माहिती दिली आहे. स्टॉर्मी डेनियल्सने निर्णयानंतर ट्विट केले – होय, आणखी एक विजय!

ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केल्यानंतर स्टॉर्मी डेनियल्सने एक पुस्तक लिहिले होते, ज्यामध्ये तिने ट्रम्प यांच्यासोबतच्या आपल्या अफेयरबाबत लिहिले होते. हे पुस्तक खुप चर्चेत होते.

डेनियल्सचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांच्या सोबत कथित अफेयरनंतर तिला गप्प बसण्यासाठी पैसे देण्यात आले. यासाठी एक करार करण्यात आला होता. ट्रम्प यांच्या वकिलाकडून तिला सुमारे 97 लाख रुपये देण्यात आले होते. डेनियल्सने दावा केला होता की, 2006 मध्ये ट्रम्प यांच्या सोबत तिचे अफेयर होते. मात्र, ट्रम्प यांनी वारंवार हा दावा नाकारला आहे.