एका लहान देशाची ‘मॉडल’ मेलानिया, ‘अशी’ बनवी सुपरपावर US ची ‘फर्स्ट लेडी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगातील पॉवरफुल माणूस आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प सोमवारी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. सर्वात आधी ते अहमदाबादला जाणार आहेत आणि त्यानंतर दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. या दौऱ्यावर पूर्ण जगाची नजर आहे. अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. एका छोट्याशा देशातून मॉडेलच्या रुपातून पुढे येऊन सुपरपावर अमेरिकेची फर्स्ट लेडी बनण्यापर्यंतचा मेलानियाचा प्रवास खूपच रंजक आहे.

मेलानिया यांचा जन्म 1970 मध्ये झाला आहे. 16 व्या वर्षीच त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. त्या स्लोवेनियाई मॉडेलही राहिल्या आहेत. मेलानिया डोनाल्ड ट्रम्प यांची तिसरी पत्नी आहे. मेलानिया यांचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात.

कशा झाली भेट ?
1998 मध्ये न्यूयॉर्कच्या एका फॅशन वीक पार्टीत मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. तेव्हा ट्रम्प राजकारणात नव्हते तर रिअल इस्टेटमध्ये ते काम करत होते. फॅशन वीकदरम्यान टाईम्स स्क्वेअरच्या किट कॅट क्लबमध्ये पार्टी होती. इथेच ट्रम्प यांची नजर मेलानिया यांच्यावर पडली. तेव्हा ट्रम्प यांची दोन लग्न झाली होती. त्यांची दुसरी पत्नी मारला मॅपलपासून ते घटस्फोट घेणार होते. तेव्हा त्यांचं वय 52 वर्षे होतं तर मेलानियाचं वय 28 होतं.

इथेच त्यांनी नंबर एक्सचेंज केले. भेटीच्या एका आठवड्यानंतरच दोघांची पहिली डेट सुरू झाली. त्या काळात मेलानिया आणि ट्रम्प यांचा रोमँस जोरात सुरू होता. त्यांची भेट चर्चेचा विषय बनू लागली होती.

5 वर्ष सोबत राहिल्यानंतर केलं लग्न
5 वर्ष एकत्र राहिल्यानंतर ट्रम्प आणि मेलानिया विवाहबद्ध झाले. 2004 मध्ये त्यांनी साखरपुडा केला तर 2005 साली त्यांनी लग्न केलं. रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी मेलानियाला 1.5 मिलियन डॉलरची डायमंड रींग घालत लग्नासाठी प्रपोज केलं होतं. 2006 साली मेलानिया अमेरिकन नागरिक झाल्या आणि त्यांनी मुलाला जन्म दिला. दोघांच्या लग्नात बिल गेट्स आणि हिलेरी क्लिंटन यांनीही उपस्थिती दाखवली होती. ट्रम्प यांच्या मुलाचं नाव बॅनर ट्रम्प आहे.

2016 साली बनल्या फर्स्ट लेडी
2016 ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्रपती झाले आणि मेलानिया अमेरिकेच्या फर्स्ट लेडी बनल्या. ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर तब्बल 23 देशांचा दौरा केला आहे. मेलानिया आपल्या सौंदर्यासाठी खूपच फेमस आहेत. गुगलवर त्यांना मोठ्या प्रमाणात सर्च केलं जातं.

मेलानिया डोनाल्ड यांची तिसरी पत्नी
ट्रम्प यांनी सर्वात आधी इवानासोबत लग्न केलं होतं. त्यांना तीन मुलं आहेत. यानंतर ट्रम्प यांनी मारला मॅपल्स सोबत दुसरं लग्न केलं त्यांना एक मुलगी आहे. टिफनी ट्रम्प असं तिचं नाव आहे. यानंतर ट्रम्प यांनी तिलाही घटस्फोट दिला आणि मेलानियासोबत तिसरं लग्न केलं.

View this post on Instagram

Greetings from @whitehouse

A post shared by First Lady Melania Trump (@flotus) on

You might also like