भविष्यात शिवसेनेला NDA मध्ये स्थान नाही, राऊत हे उद्धव ठाकरेंचे ‘जोसेफ गोबेल्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आणि शिवसेनेत सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. युती तुटल्याची केवळ अधिकृत घोषणाच बाकी आहे. असे असतानाच भाजप नेते राम माधव यांनी आज शिवसेनेवर टीका केली आहे. इतकेच नाही तर भविष्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत(NDA) शिवसेनेला स्थान मिळेल ही शक्यता मावळल्यात जमा आहे असेही ते म्हणाले. भाजपवर सतत टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत उद्धव ठाकरेंचे जोसेफ गोबेल्स आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेक वर्षे एकत्र आलेले दोन्हीही पक्ष सध्या एकमेकांविरोधात दंड थोपटताना दिसत आहेत. खोट बोलणाऱ्यांशी मैत्री ठेवायची नाही असं शिवसेनेनं म्हटलं आहे. इतकेच नाही तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्याच्या राजकारणावर बुधवारी प्रथमच भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीचं खापरही शिवसेनेवरच फोडलं. त्यानंतर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते राम माधव यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेसाठी एनडीएची दारं कायमची बंद झाली आहेत असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची तुलना त्यांनी हिटलरशी केली आहे. संजय राऊत सतत भाजपवर टीका करत आहेत त्यामुळेच भाजपचे राष्ट्रीय नेते आता त्यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like