दूरसंचार विभागात नोकरीची ‘सुवर्णसंधी’, 101 जागा उपलब्ध, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरु शकते कारण दूरसंचार विभागात 101 जागांवर 2 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीधर असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. हा अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च 2020 असणार आहे.

पद आणि पदसंख्या –
1. उपविभागीय अभियंता – 90 जागा
2. कनिष्ठ दूरसंचार अधिकारी – 11 जागा

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानमधील पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 2 मार्च 2020 रोजी 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज प्रक्रिया –
उमेदवाराला आपला अर्ज निश्चित केलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठीचा अर्ज हा या https://dot.gov.in/sites/default/files/2020_01_03%20VCC%20DGT.pdf?download=1 लिंकमध्ये देण्यात आलेला आहे. यासाठी अर्जदार या https://dot.gov.in/all-vacancies लिंकवर क्लिक करु शकतात.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
government of india, Directorate general of telecommunications headquarters, ministry of telecommunications, 9 th floor, communication building, new delhi, 110001 या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल.

वेतनमान –
47,600 रुपये – 1,51,100 रुपये

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 2 मार्च 2020