Dr Aniket Jagtap | डॉ.अनिकेत जगताप (AIR -04) बनणार कॅन्सर स्पेशालिस्ट !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr Aniket Jagtap | गावाकडील मुलगा, शेतकरी कुटुंबात जन्म. पण, स्वप्नांचे मोठे आकाश. डॉक्टर होऊन गरीब रुग्णांना मदत करायची. या स्वप्नासाठी त्याने खूप मेहनत केली. अभ्यासात कधीच कसर सोडली नाही. शेवटी, त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. ऑन्कोलॉजीसाठी INICET 2023 (AIIMS) सुपरस्पेशालिटी परीक्षेत संपूर्ण देशात AIR -04 मिळवून त्याने दैदिप्यमान यश मिळवले. (Dr Aniket Jagtap)

डॉ. अनिकेत बापूसाहेब जगताप हे मूळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कालठण नं 1 चे रहिवासी आहेत. त्यांचे वडील पी.डी.सी.सी बँकेत ब्राँच मॅनेजर आहेत. आई गृहिणी. अनिकेतचे शिक्षण सुरुवातीला इंदापूर येथील शाळेत झाले. त्यानंतर, त्याने सायन हॉस्पिटल, मुंबई येथून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. पदविकासाठी एम डी मेडिसिन साठी  त्याने सफदरजंग मेडिकल कॉलेज, दिल्ली येथे प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये असताना त्यांनी कॅन्सर स्पेशालिटीमध्ये रस घेतला आणि त्यात करिअर करण्याचा निर्णय घेतला. (Dr Aniket Jagtap)

डॉ. अनिकेत यांचे म्हणणे आहे की, “कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत. मी कॅन्सर स्पेशालिस्ट म्हणून काम करून गरीब रुग्णांना मदत करू इच्छितो.”

डॉ. अनिकेतच्या यशाने ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा मिळाली आहे. हे सिद्ध झाले आहे की,
मेहनत आणि जिद्दीने प्रयत्न केल्यास कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते.

डॉ. अनिकेतच्या यशाबद्दल त्यांचे कुटुंब आणि गावाचे लोक खूप आनंदी आहेत. त्यांना विश्वास आहे की,
डॉ.अनिकेत आपल्या क्षेत्रात एक यशस्वी डॉक्टर बनेल आणि आपल्या लोकांना, गरीब रुग्णांना मदत करेल.

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी डॉक्टर अनिकेत जगताप व जगताप परिवारांचे अभिनंदन केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | संरक्षण दलातील अधिकाऱ्याची तब्बल 74 लाखांची फसवणूक,
दापोडी मधील घटना

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार