Pune Crime News | नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News | महिलेच्या बँक खात्याचा नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन 15 लाख 65 हजार रुपये काढून घेत फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे (Cheating Via Net Banking). याप्रकरणी एका व्यक्तीवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Pune Police) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुण्यातील शनिवार पेठेत 1 फेब्रुवारी 2022 ते 7 जुलै 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत शनिवार पेठेत (Shaniwar Peth) राहणाऱ्या 34 वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) गुरुवारी (दि.23) फिर्याद दिली आहे. यावरुन संतोष लक्ष्मण मोरे (वय-46 रा. सिंहगड रोड, पुणे) याच्यावर आयपीसी 420 सह आयटी अॅक्ट 66 सी नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा शनिवार पेठेत लॉजच्या नावाने इचलकरंजी बँकेत (Ichalkaranji Bank) खाते होते. आरोपीने हे खाते बंद करण्यास सांगून तो राहात असलेल्या सिंहगड रोड परिसरातील एस.बी.आय बँकेच्या (SBI Bank) शाखेत खाते उघडण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने खाते उघडण्याकरीता फिर्य़ादी यांच्याकडून बँकेचा फॉर्म भरुन घेतला. त्यावेळी फॉर्ममध्ये आरोपीने त्याचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी टाकला.

आरोपीने फिर्य़ादी व त्यांच्या लॉजच्या नावावर असलेल्या बँक खात्याचा नेटबँकिंगचा पसवर्ड
घेऊन दोन्ही बँक खात्यातून 15 लाख 65 हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार फिर्य़ादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुरुवारी संतोष मोरे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड (Senior PI Ravindra Gaikwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घोरपडी पेठ खून प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नब्या लोधा व त्याच्या 3 साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 89 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुण्यातील धक्कादायक प्रकार, UPSC करणाऱ्या तरुणीचा शिक्षकाकडून विनयभंग

FIR On Dr Ashish Bharti | अ‍ॅटिजेन टेस्टिंग किट घोटाळा : पुणे महापालिकेच्या तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Pune PMC News | ‘माननीया’च्या आशिर्वादाने अभियंत्याला दोन मलईदार खात्यांची ‘जहागीरी’ ! अभियंत्याच्या ‘कतृत्वाने’ दोन्ही खात्यातील अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली

‘कपिल शर्मा’च्या नावाने 10 वेळा फोन, अश्लील बोलून महिलेचा विनयभंग; कल्याणीनगर मधील घटना

पुण्यातील तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक