Pune Crime News | भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime News | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. भररस्त्यात महिलांसोबत छेडछाड करुन त्यांचा विनयभंग करण्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. उरुळी देवाची बस स्टॉप येथील सार्वजनिक रोडवरुन जाणाऱ्या महिलेच्या मुलाच्या अंगावर गाडी घातली. याचा जाब विचारला असता तिचा हात पकडून दुप्पटा ओढून विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Pune Police) दोघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत उरुळी देवाची येथील 30 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी सुरज मोहन कांबळे (वय-23) व स्वयंभु शंकर पाटोळे (वय-24 रा. हरपळे वस्ती, पावर हाऊस, हडपसर) यांच्यावर आयपीसी 354, 354अ, 323 सह मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) कलम 184 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना उरुळी देवाची बस स्टॉप येथील सार्वजनीक रोडवर गुरुवारी (दि.23) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांचे पती व मुलासोबत उरुळी देवाची बस स्टॉप
येथील सार्वजनिक रोडवरुन जात होत्या. त्यावेळी आरोपी पाटोळे
याने दुचाकी वेडीवाकडी धोकायदायक बेदरकार चालवून फिर्यादी यांच्या मुलाच्या अंगावर घातली. त्यावेळी फिर्य़ादी यांनी ‘वेडीवाकडी गाडी का चालवतो?’ असे विचारले. याचा राग आल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या सुरज कांबळे याने फिर्य़ादी यांचा हात पकडला. तसेच त्यांच्या अंगावरील दुप्पटा हिसकावून विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. महिलेने तक्रार दिल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घोरपडी पेठ खून प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नब्या लोधा व त्याच्या 3 साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 89 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुण्यातील धक्कादायक प्रकार, UPSC करणाऱ्या तरुणीचा शिक्षकाकडून विनयभंग

FIR On Dr Ashish Bharti | अ‍ॅटिजेन टेस्टिंग किट घोटाळा : पुणे महापालिकेच्या तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Pune PMC News | ‘माननीया’च्या आशिर्वादाने अभियंत्याला दोन मलईदार खात्यांची ‘जहागीरी’ ! अभियंत्याच्या ‘कतृत्वाने’ दोन्ही खात्यातील अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली

‘कपिल शर्मा’च्या नावाने 10 वेळा फोन, अश्लील बोलून महिलेचा विनयभंग; कल्याणीनगर मधील घटना

पुण्यातील तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक