Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणावरुन वाद घालून दोघांनी एका तरुणावर सत्तुरने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच कारच्या बोनेटवरुन फरपटत नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची घटना भोसरीत घडली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.23) रात्री आळंदी रोड परिसरात घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

या घटनेत प्रशांत विनायक नकाते (वय-30 रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) हे जखमी झाले असून त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी रुपेश रमेश बैचे (वय-31 रा. चक्रपाणी रोड, भोसरी, सध्या रा. हनुमान कॉलनी, आळंदी रोड, भोसरी), विशाल प्रकाश भोईर (वय-21 रा. हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी) यांच्यावर आयपीसी 307, 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा कुरिअरचा व्यवसाय आहे. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. आरोपींनी गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आळंदी रोड परिसरात फिर्यादी यांच्यासोबत जुन्या भांडणावरुन वाद घातला. रुपेश बैचे याने फिर्य़ादी यांच्या कानशीलात लगावत सोबत आणलेला सत्तूर बाहेर काढला. त्याने प्रशांत नकाते यांच्या पोटात सत्तूर भोसकून गंभीर जखमी केले. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाहीतर आरोपींनी त्यांच्या कारच्या बोनेटवरुन फिर्य़ादी यांना फरपटत नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घोरपडी पेठ खून प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नब्या लोधा व त्याच्या 3 साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 89 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुण्यातील धक्कादायक प्रकार, UPSC करणाऱ्या तरुणीचा शिक्षकाकडून विनयभंग

FIR On Dr Ashish Bharti | अ‍ॅटिजेन टेस्टिंग किट घोटाळा : पुणे महापालिकेच्या तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Pune PMC News | ‘माननीया’च्या आशिर्वादाने अभियंत्याला दोन मलईदार खात्यांची ‘जहागीरी’ ! अभियंत्याच्या ‘कतृत्वाने’ दोन्ही खात्यातील अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली

‘कपिल शर्मा’च्या नावाने 10 वेळा फोन, अश्लील बोलून महिलेचा विनयभंग; कल्याणीनगर मधील घटना

पुण्यातील तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक