पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘मला सलमान भाई म्हणतात, आत्ताच हाफ मर्डरमधून बाहेर आलो आहे, सर्वांनी मला हप्ता द्यायचा’ असे म्हणत हातात धारदार कोयता घेऊन रस्त्यावरील लोकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या भाई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.23) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरी गावातील सार्वजनिक रोडवर घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत सुरक्षा रक्षक प्रकाश बहादूर शहा (वय-24 रहिमा एक्सीलन्स सोसायटी, पिंपरी गांव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सलमान शेख (वय-30 रा. काळेवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 352, 506 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सलमान हा हातामध्ये धारधार कोयता घेऊन सार्वजनिक रस्त्यावर आला.
पिंपरी गावात नवमहाराष्ट्र शाळेकडून म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर
त्याने कोयत्याचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. ‘सगळ्यांनी मला घाबरून रहायचे.
मला सलमान भाई म्हणतात.
आत्ताच हाफ मर्डरमधुन बाहेर बाहेर आलो आहे, सर्वांनी मला हप्ता द्यायचा,
नाहीतर एकेकाला तोडुन टाकीन’ असे म्हणत रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या
लोकांच्या अंगावर धावून जात होता.
आरोपी कोयता घेऊन फिर्यादी प्रकाश शहा यांच्या अंगावर धावून येताच ते तिथून पळून जाऊन
आडबाजूला लपुन बसले. तसेच सलमनाच्या दहशतीला घाबरुन परिसरातील लोक इकडे-तिकडे
जीव मुठीत धरुन धावत होते. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
घोरपडी पेठ खून प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नब्या लोधा व त्याच्या 3 साथीदारावर ‘मोक्का’!
पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 89 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA
Pune Crime News | मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांकडून अटक
पुण्यातील धक्कादायक प्रकार, UPSC करणाऱ्या तरुणीचा शिक्षकाकडून विनयभंग
‘कपिल शर्मा’च्या नावाने 10 वेळा फोन, अश्लील बोलून महिलेचा विनयभंग; कल्याणीनगर मधील घटना
पुण्यातील तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक