डाॅ. अभय तळवळकर यांना डाॅ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार जाहीर

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – नीरा (ता. पुरंदर) येथील होमिओपॅथिक तज्ञ डाॅ. अभय शामकांत तळवळकर यांना महाराष्ट्र कौन्सिल ॲाफ होमिओपॅथी परिषदेचा डाॅ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या होमिओपॅथी चिकित्सा पध्दतीचा प्रचार, प्रसार, शिक्षण व संशोधन क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानाबद्दल डाॅ. तळवळकरांना होमिओपॅथिक परिषदेने यावर्षीचा डाॅ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला असून त्याचे वितरण मुंबई येथे करण्यात येणार आहे.

होमिओपॅथीच्या माध्यमातून डाॅ. तळवळकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध विषयांवर प्रबंध सादर केलेले आहेत. मलेशिया, सिंगापूर येथे झालेल्या होमिओपॅथिक परिषदेत प्रबंध उत्कृष्ट ठरला होता. त्यावेळी त्यांना गौरविण्यात आले होते. सन २००९ मध्ये सिंगापूर येथे प्रथमच झालेल्या होमिओपॅथिक परिषदेमध्ये त्यांचा पेन मॅनेजमेंट ‘बाळंतपणा दरम्यान वेदना व्यवस्थापन’ वरील प्रबंधाबद्दल त्यांना मलेशिया येथील M.F. (Hom) ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सन २०१० मध्ये इंग्लड येथील होमिओपॅथी काॅलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी त्यांना मिळाली होती. सध्या डाॅ. तळवळकर नीरा, पुणे, मुंबई व दुबई येथेल रूग्णांवर होमिओपॅथिक उपचार करतात. पुणे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘प्राणा’ या होमिओपॅथिक व योगा सेंटरचे वरिष्ठ कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. तळवळकर यांना पुरस्कार जाहीर झाल्याबदल नीरा मेडिकल असोसिएशन यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/