डॉ. सुजय विखे यांचा मुन्नाभाई म्हणून उल्लेख

निवडणूक अधिकाऱ्यांकडे आचारसंहिताभंगाची तक्रार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. सुजय विखे पाटील हे मुन्नाभाई एमबीबीएस असल्याचा उल्लेख करणारे व्यंगचित्र काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. मतदारांच्या मनात उमेदवाराबद्दल द्वेष निर्माण केल्याचा आरोप सदर तक्रारीत करण्यात आला आहे.

उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अभिजीत दिवटे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे रितसर लेखी तक्रार दाखल केली आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे स्वत: न्युरोसर्जन आहेत. या मतदार संघातून भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. डॉ. सुजय विखे पाटील हे डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखाना, मुळा प्रवरा सोसायटी या संस्थेचे चेअरमन आहेत. डॉ. विखे पाटील फौंडेशन विळदघाट या शैक्षणिक संस्थेचे मुख्य कार्यकारी आधिकारी व विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.

समाज घटकांकरीता गेली अनेक वर्षे आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक कार्य केले आहे त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे. मात्र दि. ११ एप्रिल रोजी व्हॉट्सऍप नंबर 9975616161 यावरुन अहमदनगर दक्षिण मुन्ना भाई एम. बी. बी. एस या शिर्षकाखाली व्यगंचित्र काढून प्रसिध्द केले आहे. मुन्ना भाई एम. बी. बी. एस हा संजय दत्त यांच्या चित्रपटात मेडीकलची पदवी नसलेला बोगस डॉक्टर दाखविलेला आहे. त्याचा आधार घेवून डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रतिमा बोगस डॉक्टर म्हणून दाखविली असल्याकडे निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like