अभिमानास्पद ! ‘अस्त्र’ मिसाईलची चाचणी यशस्वी, आता पाकच्या विमानांना 70 किमी अंतरावरून उडवता येणार

कोलकाता : वृत्तसंस्था –  हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानावरून हे क्षेपणास्त्र डागता येणार आहे. यामुळे हवाई क्षेत्रात भारताची ताकत वाढली आहे.

पश्चिम बंगालच्या हवाई तळावरून सुखोई विमानाने आज उड्डाण केले. या अस्त्र क्षेपणास्त्राने 70 किमी दूरवर असलेल्या लक्ष्याला अचूक निशाना साधला. या क्षेपणास्त्राची अनेकदा चाचणी घेण्यात आली होती. या यशस्वी चाचणीमुळे डीआरडीओला मोठे यश प्राप्त झाले आहे.

क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये –
हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करू शकणारे भारताने विकसित केलेले पहिलेच क्षेपणास्त्र आहे.
हे क्षेपणास्त्र मिराज 2000 एच, मिग 29, सी हॅरिअर, मिग 21 आणि सुखोईलाही वापरता येणार आहे.
भारताच्या हद्दीत राहून पाकिस्तानच्या हद्दीतील विमाने या क्षेपणास्त्रामुळे पाडता येणार आहेत.

 

You might also like