थंड पाणी पिताय ? येऊ शकतात ‘या’ 4 गंभीर समस्या ! दुलर्क्ष करणं ठरू शकतं ‘घातक’

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. उन्हाळ्यात तर सर्वांनाच थंड पाणी हवं असतं. थंड पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही आहेत. थंड पाणी पिल्यानंतर शरीरात काय बदल होतात आणि आपल्याला काय समस्या येतात याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) सर्दी – खोकला – फ्रीजमधील पाणी हे कृत्रिमरित्या थंड केलेलं असतं. असं पाणी आपल्या प्रतिकार शक्तीसाठी नुकसानदायक असतं. जर असं पाणी वारंवार पिलं तर छातीत कफ जमा होतो. परिणामी आपल्याला लगेचच सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागतो.

2) वजन कमी होत नाही – जर तुम्हाला वजन कमी करून बारीक व्हायचं असेल तर थंड पाणी पिणं टाळायला हवं. गरम पाणी जास्त उत्तम आहे. जर तुम्हाला थंड पाणी हवंच असेल तर तुम्ही माठातल्या पाण्याचं सेवन करू शकता. तज्ज्ञ सांगतात की, थंड पाण्याचं सेवन केल्यानं शरीरात साचलेलं फॅट आणखी कडक होतं. यामुळं फॅट बर्न करण्यास समस्या निर्माण होते.

3) हृदयासाठी घातक – जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातील हार्ट रेट म्हणजेच हृदयाची धडधड कमी वेगानं होते. हे आपल्या हृदयाच्या कार्यासाठी योग्य नाही. म्हणून थंड पाणी पिल्यानंतर हृदयावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि यामुळं विविध आजार उद्भवण्याची शक्यता असते.

4) पोट साफ न होणं – थंड पाणी पिलं तर पचनशक्ती मंदावते. तसंच आतडेही आकुंचन पावतात. जेवण नीट पचत नाही. यामुळं पोट साफ न होण्याची समस्या येते. थंड पाणी हवं असेलच तर तुम्ही माठातलं पाणी पिऊ शकता.