गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यु

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील कावठी गावात गुरे चारण्यासाठी गेलेला शेतकरी तलावात बुडून मयत झाला. कावठी गावातील शेतकरी छोटु संतोष पाटील वय. 30 शेतकरी गुरे चारायला गेला होता. त्यानंतर काही वेळाने गुरांना पाणी पाजण्यासाठी तो गुरांना तलाव जवळ घेऊन गेला. त्याच वेळी अचानपणे त्याचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. यावेळी त्याने आरडाओरड केली. त्याला पोहता येत नव्हते. तलावाजवळ काही लोक होते. त्यांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न सुरु केले. काही लोक गावात पळत गेले व अन्य लोकांना तलावाजवळ मदतीसाठी घेऊन आले.

परंतू बराच वेळ झाल्याने तो खोल पाण्यात बुडाला होता. तासाभराने पाण्यात शोध घेतल्या नंतर मृतदेह हाती लागला. नातेवाईकांच्या मदतीने जवळील कुटीर रुग्णालयात त्याला नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. शवविच्छेदन करुन पोलीसांनी मृतदेह नागरीकांचे ताब्यात दिला. सायंकाळी उशीरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. पोलीसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या