Drugs Case : पावना फार्म हाऊसमध्ये झालेल्या पार्टीबाबत काय म्हणाली श्रद्धा कपूर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या चौकशीत फिल्म अभिनेत्री श्रद्धा कपूरने म्हटले की, फिल्म ‘छिछोरे’च्या रिलिजनंतर एक पार्टी पावना फार्म हाऊसमध्ये झाली होती. दुपारी तीन वाजता आम्ही तिथे पोहचलो. लंचनंतर बोटीतून आम्ही आयलँडवर पोहचलो होतो, तिथे ड्रग्ज आणि अल्कोहोलची पार्टी झाली. यात आम्ही म्युझिकवर रात्री उशीरापर्यंत नाचलो. परंतु मी त्या पार्टीत ड्रग्ज घेतले नव्हते.

एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा हे श्रद्धा आणि सारा अली खानची चौकशी करण्यासाठी एनसीबी बिल्डिंगमध्ये गेले. दीपिका पदुकोण आणि करिश्मा प्रकाशच्या चॅटबाबत कन्फ्रटेशन टीमचे इतर लोक करत आहेत. चॅटबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. अजूनही दिर्घकाळ कन्फ्रटेशन चालेल.

दीपिका जेव्हा एनसीबीच्या कार्यालयात आली तेव्हा आरामात बसली. एनसीबी टीमने शिष्टाचाराप्रमाणे तिला चहा बिस्किट दिले आणि तिने चहासुद्धा घेतला. दीपिकाने मान्य केले की, ड्रग्जसंबंधी चॅट तिचेच आहे. परंतु, ड्रग्ज घेत होती किंवा नाही, या प्रश्नांची उत्तरे कन्फ्रटेशन नंतरच स्पष्ट होतील. केपीएस पुन्हा येथे येऊन दुसर्‍यांदा दीपिका आणि करिश्माची चौकशी करतील.

सारा अली खानने एनसीबीच्या चौकशीत म्हटले की, 2018च्या फेब्रुवारीमध्ये केदारनाथ फिल्मच्या शुटिंगच्या दरम्यान दोघांमध्ये रिलेशनशिप सुरू झाली होती. फिल्मच्या शुटिंगनंतर ती सुशांतच्या घरात राहण्यासाठी सुद्धा गेली होती. दोघे पाच दिवसासाठी थायलंडच्या कोह समुई आयलँडवर गेले होते, जेथे पार्टी सुद्धा झाली होती. साराने म्हटले की, शूटिंगच्या दरम्यान सुशांत ड्रग्ज घेत होता. तिने स्वता ड्रग्ज घेत नसल्याचे सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like