बावधनमधील रेस्टोबारमध्ये ‘मद्यधुंद’ पोलिस कर्मचार्‍याचे ‘डांगडिंग’, ‘TV स्टार’सोबत गैरवर्तन केल्यानं झालं निलंबन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बावधन येथील टिपसी टर्टल या रेस्टॉबारमध्ये काही टीव्ही स्टारबरोबर गैरवर्तन करणाऱ्या विभागीय उपअधीक्षक कार्यालयातील मद्यधुंद काॅन्स्टेबलला ग्रामीण पोलिसांनी निलंबित केले. नितीन कदम असे या पोलीस काॅन्स्टेबलचे नाव आहे. तो हवेली उपविभागीय पोलीस उपअधीक्षक कार्यालयात नियुक्तीला होता. ही घटना बावधन येथील टिपसी टर्टल या रेस्टॉबारमध्ये रविवारी घडली.

या काॅन्स्टेबलने तेथे असणाऱ्या टीव्ही स्टार व काही महिलांबरोबर गैरवर्तन केले. त्याने महिलांवर अश्लील हावभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांनी त्या काॅन्स्टेबलला निलंबित केले आहे.

या घटनेचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओ क्लिपमध्ये कदम महिलांना तो आपण पोलीस असल्याचे सांगताना दिसतो. तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो नाचताना, पैसे दाखविताना आणि महिलांकडे पाहून अश्लिल हावभाव करताना दिसून येतो. त्यांच्या ग्रुपच्या टेबलवरील डिशेस पाडल्या. त्याचे बिल आपण देतो असे सांगताना दिसतो. त्यानंतर त्या रुममधून घाबरुन बाहेर गेलेल्या महिलांना शिवीगाळ करताना दिसत आहे.

याबाबत या ग्रुपमधील काही जणांनी सांगितले की, आम्ही सर्व जण एकत्र हॉटेलमध्ये बसलो असताना अचानक हा पोलीस काँस्टेबल तेथे आला. तो भरपूर दारु पिलेला होता. जेव्हा म्युझिक सुरु झाले. तेव्हा आमच्यातील काही जण टेबलजवळ नाचू लागले. तेव्हा तो आमच्या टेबलाजवळ आला. तो त्यांच्यात न सांगता येऊन नाचू लागला. तो आमच्या टेबलजवळ आला व त्याला त्याचा तोल सावरता आला नाही. त्यामुळे टेबलावरील सर्व वस्तू पाडल्या. हॉटेलमधील वेटरला दुसऱ्या डिशेस आणायला लावल्यावर त्याने याचे पैसे मी देतो, असे सांगू लागला. आम्ही त्याला समजावून सांगू लागलो. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. येथील तरुणींमधील एकीला तो ‘अ‍ॅटम’ म्हणून संबोधू लागला. तेव्हा ग्रुप त्याला टाळायला लागला. त्यानंतर तो आपण पोलीस असल्याचे सांगून आरडाओरडा करु लागला. त्याचे हे सर्व कृत्य ग्रुपमधील एकाने व्हिडीओ शुट केले व ते व्हायरल केले.

त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्याची दखल घेऊन हॉटेलमधील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्याबाबत उपविभागीय उपअधीक्षक सई भोरे पाटील यांनी सांगितले की, याबाबत आमच्याकडे तक्रार आली आहे. आम्ही त्या पोलीस काॅन्स्टेबलची चौकशी सुरु केली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या पोलीस काॅन्स्टेबलला निलंबित करुन त्याची चौकशी सुरु केली असल्याचे सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी