DSP देवेंद्रच्या नातेवाईकांच्या घरावर छापा, 7.5 लाख रोकड आणि आर्मी बेस कॅम्पचा नकाशा जप्त

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत कारमधून जात असताना अटक करण्यात आलेला पोलीस अधिकारी देवेंद्र सिंग याच्या चौकशीत अनेक धक्कादायक गुपितं उघडकीस आली. त्यानंतर डीएसपी देवेंद्र सिंग याच्या नातेवाइकांच्या घरात देखील छापे मारण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी एक बँक अधिकारी, एक डॉक्टर यांच्या घरावर धाड टाकली आहे. याशिवाय श्रीनगरच्या इंदिरा नगरात असलेल्या शिवमंदिरातही शोध घेण्यात आला आहे.

आर्मी बेसचा नकाशा , ७.५ लाख रोख आणि हत्यारं हस्तगत
गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितिनुसार या धाडीत लष्कराच्या १५व्या कोर चा पूर्ण नकाशा , तसेच साडेसात लाखांची रोकड आणि मोठ्या प्रमाणात हत्यार हस्तगत करण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणेला असा संशय आहे की देवेंद्र सिंग याने त्याच्या नातेवाईकांच्या घरात पैसे लपवले होते. छापेमारी दरम्यान ड्रोन कॅमेर्‍यांच्या साहाय्याने संपूर्ण परिसराचा आढावा घेतला जात होता. डीएसपी देवेंद्र सिंग आणि त्याच्यासमवेत अटक केलेले हिज्बुलचे दोन अतिरेकी नावेद बाबू आणि आसिफ अहमद यांनी चौकशीत सांगितले आहे की पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था आयएसआय हवालामार्फत भारतात दहशतवाद्यांना पैसे पाठवत असत.

सुरक्षा यंत्रणांनी जवळपास चौकशी केली आणि इंदिरा नगर येथील शिव मंदिर येथे तपास केला. नान करणाऱ्यांकडे देखील चौकशी करण्यात आली ते शिव मंदीरात होते. त्यांच्याकडून काही देवेंद्र विषयी माहिती मिळते का हे सुरक्षा यंत्रणेचे आधिकारी पाहत होते. यावेळी सम्पूर्ण इंदिरा नगर भागात ड्रोन च्या साहाय्याने पाहणी करण्यात आली. देवेंद्रच्या चौकशीच्या दरम्यान ज्यांची नाव पुढे आली त्यांचा शोध सुरक्षा यंत्रणेचे आधिकारी घेत होते. देवेंद्र सिंगने मित्र आणि नातेवाईकांच्या घरी काही रोख रक्कम आणि शस्त्रे ठेवली असावीत अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like