दुबईतील भीषण अपघातात आठ भारतीयांचा मृत्यू

दुबई : वृत्तसंस्था – दुबईत झालेल्या भीषण बस अपघातामध्ये आठ भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला असून अपघातात एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे.स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील शेख मोहम्मद बिन झायेद महामार्गावर गुरुवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. या बसमधील अनेक प्रवाशी ईद साजरी करण्यासाठी ओमानमध्ये गेले होते. तेथून परतत असताना रशिदिया एक्झिटजवळच्या मेट्रो स्टेशनजवळ ही बस जोरात सिग्नलवर धडकली.

यावेळी बसमध्ये एकूण ३१ प्रवासी होती. यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये आठ भारतीयांचा समावेश आहे. मृतांमध्ये वेगवेगळ्या देशातील नागरिकांचा समावेश असून यापैकी चार भारतीयांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर काही जखमींवर अद्याप उपचार सुरु आहे. स्थानिक प्रशासनाने भारतीय दुतावासाला आठ भारतीयांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. सर्व मृतांची ओळख पटली आहेत. राजगोपालन, फिरोज खान पठाण, रेशमा फिरोज खान पठाण, दीपक कुमार, जमालुद्दीन, किरण जॉनी, वासुदेव आणि तिलकराम ठाकूर अशी त्यांची नावे आहेत.

या घटनेनंतर दुबईतील भारतीय दुतावास सातत्याने अपघातग्रस्त बसमधील भारतीयांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे. त्यासाठी त्यांनी हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. आमचे अधिकारी संजय कुमार (+971-504565441 or +971-565463903) यांच्याशी संपर्क साधू शकता अशी माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

Loading...
You might also like