डंपरची दुचाकीला पाठीमागून धडक ; १ ठार एक जखमी.

हिंजवडी: डंपरची दुचाकीला पाठीमागून धडक ; १ ठार एक जखमी.
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.ही घटना सोमवारी रात्री घडली आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालकाला अटक केली आहे.

प्रमोद दामू खेंगरे वय-३५ रा.खांबोली ता. मुळशी,जि.पुणे अस अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.याप्रकरणी अनिल शंकर सोनवणे वय-२८ रा.सोमाटने फाटा यांच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत प्रमोद दामू खेंगरे आणि त्यांचा चुलत भाऊ हे दोघे जण नातेवाईकांचे लग्न समारंभ करून आपल्या घरी दुचाकी क्रमांक एम.एच-१४ बी.एफ-२०६१ या वरून जात होते,मात्र भूमकर चौक वरून हिंजवडीच्या दिशेने जात असताना सिमेंट मिक्सर क्रमांक एम.एच-१२ इ.एफ-४८७४ या नंबर च्या (डंपर)ने पाठीमागून धडक दिली.या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले प्रमोद यांचा जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी सिमेंट मिक्सर चालकांवर गुन्हा दाखल केला असून त्याला हिंजवडी पोलिसानि अटक केली आहे.