महागडया आयफोन पेक्षाही सॅमसंगचा ‘हा’ फोन अधिकच भारी

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – आपण जेव्हा आयफोनचा १ लाख किमतींपर्यंतचा स्मार्ट फोन खरेदी करतो तेव्हा, त्याचा कॅमेरा हा सर्वात भारी असायला हवा, असं आपल्याला वाटत. मात्र, सॅमसंगने अलीकडेच एक स्मार्टफोन लाँच केला आहे. तो १ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असणाऱ्या आयफोनपेक्षा सगळ्याच बाबतीत स्मार्ट निघाला आहे.

सॅमसंग ने लाँच केलेल्या या फोनचा कॅमेरा हा आयफोनच्या कॅमेरापेक्षा चांगला असल्याचं जाहीर झालं आहे. जगभरातील स्मार्टफोनच्या कॅमेराला रेटिंग देणारी बेवसाईट DxOMark ने ही यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये टॉप १० कॅमेरा स्मार्टफोनच्या यादीत Samsung Galaxy S20 Plus या स्मार्टफोनने स्थान पटकावलं आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनला ११८ गुणांसह १० वे स्थान मिळालं आहे. तसेच iPhone 11 Pro Max ला ११७ गुणांसह ११ वे स्थान मिळालं आहे. या यादीमध्ये सर्वात जास्त गुणांसोबत पहिले स्थान Huawei P40 Pro या स्मार्टफोनला मिळाले आहे. १२८ गुण मिळवून या फोनने बाजी मारल्याचं दिसत आहे.

Samsung Galaxy S20 Plus ची रेटिंग

Samsung Galaxy S20 Plus या फोनचा फोटोचा स्कोर १२७ गुण राहिला आहे. या फोनचा अल्ट्रा वाइड कॅमेरा जबरदस्त असून, तो लो-लाईट आणि इनडोर मध्ये फार काही करू शकत नाही. व्हिडीओ क्वॉलिटीत याला १०० गुण मिळालं आहे. त्यामुळे रेटिंग फर्मने या फोनचा समावेश टॉप टेन मध्ये केला. मात्र, या स्मार्टफोनचा १२ मेगाफिक्सलला प्रायमरी कॅमेरा आणखी थोडा चांगला करता आला असता. तर सॅमसंग गॅलेक्सी एस २० प्लस या स्मार्टफोनला आयफोनच्या महागड्या फोनपेक्षा जास्त गुण मिळाल्याने कंपनीला याचा चांगला फायदा मिळू शकतो.

आयफोन ट्रिपल कॅमेराचा सेटअप

सॅमसंग गॅलेक्सी एस २० प्लस मध्ये क्वॉड कॅमेरा व स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेराचा सेटअप दिलाय. आयफोनमध्ये १२ मेगापिक्सल प्लस १२ मेगापिक्सल प्लस १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर गॅलेक्सी एस २० प्लस मध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आणि डेप्थ सेन्सर दिला आहे.