Amazon वर बनावट रिव्ह्यू घेऊन ‘कमाई’ करत होता ‘हा’ तरुण, 4 महिन्यांत 19 लाख मिळावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही चिनी कंपन्या पैसे देऊन त्यांच्या वस्तूंचे बनावट रिव्ह्यू अमेझॉनवर घेत होते. एका वृत्तसंस्थेमधून ही बाब समोर आली आहे. एका रिव्ह्यू करणाऱ्या व्यक्तीने सुमारे तीन महिन्यांत बनावट रिव्ह्यू करून किमान 19 लाख रुपये कमावले. काही चिनी कंपन्या अमेझॉनवर पैसे देऊन त्यांच्या वस्तूंचे बनावट रिव्ह्यू घेत होते.

रिपोर्टमध्ये असा खुलासा झाला की, टॉप रिव्ह्यूअर्स पैसे घेऊन अमेझॉनवर 5 स्टार रेटिंग देत होते. प्रथम ते उत्पादन विकत घेत असत आणि नंतर अमेझॉनवर 5 स्टार रेटिंग देत होते. नंतर, कंपन्यांकडून त्यांना परत रिफंड केले जात होते, बर्‍याच वेळा त्यांना इतर भेटवस्तू देखील मिळाल्या. जस्टिन फ्रायर नावाची व्यक्ती अ‍ॅमेझॉन डॉट कॉमवर नंबर -1 रिव्ह्यूअर्स आहे. ऑगस्टमध्ये त्यांनी 14 लाख रुपयांच्या वस्तूंचा रिव्ह्यू घेतला. दर 4 तासांनी ते एका नवीन सामानाचे 5 स्टार रिव्ह्यू करत होते. अहवालानुसार जस्टिन नंतर अ‍मेझॉनकडून खरेदी केलेल्या वस्तूंची विक्री eBay वर करत असे. जूनपासून जस्टिनने 14 लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे. तथापि, जस्टिन यांनी पैसे घेऊन रिव्ह्यू करण्याच्या आरोपाला नकार दिला.

चिनी कंपन्या सोशल मीडिया ग्रुपवर आणि मेसेजिंग अ‍ॅप्सवर अशा रिव्ह्यूअर्सशी संपर्क साधतात जे पैसे घेऊन बनावट रिव्ह्यू करतात. असे काही ग्रुप टेलिग्रामवर आढळले ज्यात हजारो 5 स्टार रिव्ह्यू करण्याचा दावा करतात.