खळबळजनक ! नेपाळच्या रिसॉर्टध्ये आढळले केरळच्या ८ पर्यटकांचा मृतदेह, प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : नेपाळच्या एका रिसॉर्टमध्ये केरळमधील ८ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील हे पर्यटक सहलीसाठी नेपाळ आले होते. यावेळी मंगळवारी (२१) नेपाळच्या दमनमधील एका रिसॉर्टमध्ये या आठही पर्यटकांचे मृतदेह सापडले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, गॅस हिटरमुळे या पर्यटकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

केरळमधील काही लोक नेपाळमध्ये पर्यटनासाठी आले होते. त्यातील आठ जणांचा रिसॉर्टमधील गॅस हिटरमुळे मृत्यू झाल्याचे समजते आहे. रुममधील हिटर चालू असताना रूमच्या दरवाजा आणि खिडक्या बंद असल्याकारणाने गुदमरून या पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे. मंगळवारी रिसॉर्टमध्ये हे आठही जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांनतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आलं. मात्र काठमांडू येथील रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

फेसबुक पेज लाईक करा –