भाजप नेते एकनाथ खडसे आणि गरीश महाजन एकाच मंचावर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असल्याचे उघड झाले आहे. एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी गौप्यस्फोट करत पक्षाला घरचा आहेर दिला होता. मात्र, आज जळगावमधील भाजपच्या कार्यालयामध्ये भाजपचे नते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर आल्याचे पहायला मिळाले.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी भाजपच्या कार्यालयात भेट झाली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पदाधिकारी आणि सदस्यांची ही बैठक बोलावण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खडसे हे भाजपच्या बैठकीत दिसून आले. विशेष म्हणजे, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. दोन्ही नत्यांच्या बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे तर काहीच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुलीच्या पराभवास आणि आपले तिकीट कापण्यात पक्षातील काही लोकांचा हात असल्याचा आरोप करणारे एकनाथ खडसे यांनी आता थेट संबंधित नेत्यांची नावे जाहीर केली. मला तिकीट मिळू नये म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत नकारात्मक अहवाल दिला होता. या कमिटीतील माझ्या जवळच्या मित्रांनीच मला ही माहिती दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट खडसेंनी केले होता.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/