Eknath Khadse | भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा चौकशी लावण्यामागे भाजपाचा हात, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी भूखंड घोळाटा प्रकरण (Bhosari MIDC Land Scam Case) बंद होणार असे वाटत असतानाच तक्रारदाराने आक्षेप घेतल्याने ते पुन्हा बाहेर आले आहे. भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची पुन्हा चौकशी (Inquiry) होणार आहे. पुण्यातील बंडगार्डन (Bundagarden Police Station) येथे एकनाथ खडसे यांच्यावर एसीबीने गुन्हा (ACB FIR) दाखल केला होता. या प्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची चौकशी झाल्यानंतर तपासी अधिकार्‍यांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता.

 

दरम्यान, तक्रारदाराने आक्षेप घेतला की, ज्या बाबींची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्याचा तपास झालेला नाही. यामुळे न्यायालयाने पुन्हा दिवाळीनंतर कागदपत्रे मिळताच तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून या सर्व हालचालींमागे भाजपा (BJP) असल्याचा आरोप केला आहे.

 

या प्रकरणी प्रतिक्रिया देताना खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले की, आतापर्यंत चार ते पाच प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण सुदैवाने न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिल्यामुळे आज मी बाहेर आहे. पण भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाथाभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कारण नाथाभाऊंना गुन्ह्यांमध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोप्या जातात.

 

खडसे यांनी म्हटले की, अँटी करप्शनकडून (Anti Corruption Bureau) पूर्णपणे चौकशी होऊन
याचा क्लोजर रिपोर्ट दोन वर्षांपूर्वी न्यायालयात सादर करण्यात आला.
आता मात्र राज्य सरकारने (State Government) आपल्याच तपासणी अधिकार्‍यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत
पुन्हा चौकशी अहवाल सादर केला असून यामध्ये कुठलेही तथ्य नाही. मी यात निर्दोष  आहे.

 

Web Title :- Eknath Khadse | eknath khadse targets bjp for re hearing of bhosari land case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | ‘… म्हणून ते हवेत गेल्यासारखं वागतात’, रोहित पवारांचा राम शिंदेंना सणसणीत टोला

Gold-Silver Rate Today | दिवाळी सणात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | येरवड्यात पूर्व वैमनस्यातून दरबार बेकरीजवळ राहणाऱ्या तरुणाचा खून