Eknath Khadse | पक्षप्रमुख म्हणून चुका होतात, पण चूक एवढी मोठी नसावी ज्यामुळे पक्षच संपावा, एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंवर टीका

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – धनुष्यबाण (Shivsena Dhanushyaban Symbol) मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आता कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. काही चुका उद्धव ठाकरेंच्या निश्चितच झाल्या असतील. पक्षप्रमुख म्हणून काम करताना चुका होत असतात. परंतु एवढी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्षच संपून टाकावा, तुम्ही पण संपले आणि ते पण. अशी स्थिती निर्माण होता कामा नये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) पत्रकारांशी बोलत होते.

 

 

यावेळी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिवसेनेतील (Shivsena) वादावर भाष्य केले. ते म्हणाले, पक्षप्रमुख म्हणून चुका होत राहतात काही चुका या उद्धव ठाकरे यांच्याकडूनही झाल्या असतील. मात्र एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्ष संपवून टाकावा, आता तेही संपले आणि तुम्ही संपले. अशी स्थिती निर्माण होता कामा नये. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे आपण सर्वजण आशेने पाहतो आहे. मात्र न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल असे वाटत नाही असेही मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोठ्या मेहनतीने शिवसेना राज्यात उभी केली, त्यांच्याच मेहनतीमुळे धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठाही संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली. आणि वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरे यांची जी पुण्याई होती त्या शिवसेनेचे दोघांच्या भांडणामुळे दोन तुकडे झाले असून शिवसेना ही दुभंगली गेली आहे. हे राज्याच्या दृष्टीने ही योग्य नाही व शिवसेनेच्या दृष्टीने ही योग्य नाही. मात्र दुसरीकडे यामुळे भाजपला (BJP) मजबूत होण्याची संधी आहे. असेही मत एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Web Title :- Eknath Khadse | Mistakes are made as a party leader, but the mistake should
not be so big that it ends the party itself, Eknath Khadse criticizes Uddhav Thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा