Eknath Khadse | ‘1993 ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला’ – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Khadse | गेल्या काही दिवसांपासून एमआयएम पक्ष (MIM) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) युतीबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी युतीबाबत प्रस्ताव दिला होता. यावरून आता आघाडी आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळते. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर टीका करताना जनाब बाळासाहेब असा शब्दप्रयोग केला होता. यानंतर आता राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.

 

‘1993 ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला,’ असं एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं आहे. पुढे खडसे म्हणाले, ”हिंदुत्वाचे प्रखर विचार मांडणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या लेखणीतून व वाणीतून समाज जागृत करण्याचे काम केले आहे, असे सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना झाल्या, असे खडसे यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीस मला वडीलधारे मानत असतील तर त्यांना सल्ला देऊन उपयोग आहे. मात्र देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असलेले वक्तव्य हे नैराश्येतून आलेले वक्तव्य असल्याचे ते म्हणाले.

 

पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, ”देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांना जनाब म्हटले.
माझ्या मनाला तीव्र वेदना झाल्या. बाळासाहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
बाळासाहेबांचा मला अनेक वर्ष सहवास राहिला आहे. मी त्यांच्याकडे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांसोबत गेलो आहे.
हिंदुत्वाबद्दल त्यांच्यातला जाज्वल्य अभिमान त्यांच्या लेखणीतून मी अनुभवलेला आहे.”

”1993 मध्ये जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाले, तेव्हा मी आमदार होतो. तेव्हाची बाळासाहेबांची भूमिका अतुलनीय आहे.
बाळासाहेब होते, म्हणून त्या काळात मुंबईतला हिंदू सुरक्षित राहिला.
हे कुणीही नाकारू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हादरलेला आणि घाबरलेला होता. रक्ताचे पाट वाहत होते.
अशा काळात मदतीला कुणीही गेले नव्हते. तेव्हा बाळासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो लोक रस्त्यावर उतरलेले मी पाहिले,” असे एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

 

फडणीस यांचे वक्तव्य हे पंतप्रधानांनाही मान्य नसेल..
”देवेंद्र फडणीस यांचे वक्तव्य हे पंतप्रधानांनाही मान्य नसेल, कारण नरेंद्र मोदी यांनी कायम बाळासाहेबांचा आदरच केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात असे वक्तव्य आम्ही कधी अनुभवले नाही,” असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Eknath Khadse | ncp eknath khadse replied bjp devendra fadnavis statement on balasaheb thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा