Eknath Khadse | एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एअर अॅम्ब्युलन्सची (Air Ambulance) व्यवस्था केली आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली.

खडसे यांना उपचारासाठी तातडीने जळगावहून मुंबईला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. खडसे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच त्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारवर (State Govt) जोरदार टीका केली होती.
राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारविरुद्ध जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश आहे.
आश्वासने देऊन विविध समाजाची दिशाभूल सरकार करत असून राज्यात आणीबाणीची स्थिती तयार झाल्याचंही ते म्हणाले होते.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जळगावमध्ये ते बोलत होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Anil Bhosale | ईडीच्या तुरुंगातून सुटका करतो, 15 कोटी द्या,
तोतया ईडी अधिकाऱ्याचा आमदार अनिल भोसलेंच्या पत्नीला फोन

NCP MLA Disqualification Case | पक्षविरोधी कृत्य केल्याने आमदारांना अपात्र का करु नये?
शरद पवार गटाने नोटीशीला दिले 10 पानी उत्तर