‘माझ्यावर जी वेळ आली ती पंकजाताईंवर येऊ नये’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – आज गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. यावेळी गोपीनाथ गडावर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते एकनाथ खडसे उपस्थित होते. यावेळी भाजपमधली फूट एकनाथ खडसेंच्या माध्यमातून समोर आली.

यावेळी भाजपवर नाराज एकनाथ खडसेंनी चंद्रकात पाटलांसमोर आपली भाजपवरील नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, “माझ्यावर जी वेळ आली ती पंकजाताईवर येऊ नये”. पंकजा एकटी नाही, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पंकजा वाघाची पोरगी आहे, वाघ आता नसला तरी काय झालं, ती वाघीण आहे.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, आता याच्यापुढचं मी काही बोलत नाही, जाऊ द्या, माझ्याकडे भरपूर काही बोलण्यासारखं आहे, फक्त येथे बोलायला वेळ नाही. परंतू माझं तिकिट कापलं, नाथाभाऊचा गुन्हा काय हे तरी सांगा. उपस्थित कार्यकर्त्यांना विचारत ते म्हणाले, तुम्हाला माझी खात्री आहे? तुम्हाला माझी खात्री आहे पण यांना माझी खात्री पटत नाही. त्यांना वाटत असेल की नाथाभाऊ आता बाहेर जावे, किती अपमान सहन करतात?

एकनाथ खडसे म्हणाले की, पंकजा मुंडेंना बोलता येत नाही, पण त्यांच्या मनात वेदना आहेत त्या ते सहन करतात. गोपीनाथ मुंडेंची मुलगी पराजित झाली यांचं दु:ख मला आहे. हे घडलं नाही घडवलं गेलं, तुम्हाला मान्य आहे की नाही, पण मला मान्य आहे. मुंडे साहेबांनी उभे आयुष्य घातलं म्हणून तुम्ही आज मंत्री झाले, नेते झाले. मी पक्ष सोडेल की नाही मला माहिती नाही, पंकजाताईचं सोडून द्या, पण माझं काही सांगता येत नाही असे म्हणत त्यांनी राजकीय सूचक संकेत देखील दिले.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/