एकनाथ खडसेंचा सस्पेंस कायम ! फडणवीसांच्या कार्यक्रमाला जाणार का ? मिळालं ‘हे’ उत्तर  

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – एकनाथ खडसे (eknath khadses) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या उपस्थितीत जामनेर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं की नाही याबाबतचा सस्पेंस कायम ठेवला आहे. यावर बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सोबत उपस्थित राहायचं की, नाही याबाबत उत्सुकता राहू द्या. आताच सगळं सांगू कसं चालेल असं वक्तव्य केलं आहे. गेल्या 4 दिवसांपासून मुंबई येथे असलेले एकनाथ खडसे (eknath khadses) हे रात्री उशीरा जळगावला परतले.

यानंतर रविवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबद्दल बोलण्यासाठी त्यांनी नकार दिला. माजी मंत्री गिरीज महाजन यांनी जामनेर येथे सुरू केलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मंगळवारी होणार आहे.