Eknath Shinde Devendra Fadnvais Government | गृहमंत्री पदावरून शिंदे-फडणवीसांमध्ये रस्सीखेच ?, खातेवाटपाच्या चर्चेला वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde Devendra Fadnvais Government | राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारमध्ये (Eknath Shinde Devendra Fadnvais Government) सध्या खातेवाटपासंबंधी हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला गेले आहेत. येथे मंत्रिमंडळात कुणा – कुणाची वर्णी लागणार, कुणाला कोणते खाते मिळणार यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गृहमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

 

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतरच मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेल असे संकेत आहेत. कालच्या बैठकीत सरकारमध्ये प्रामुख्याने नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचे भाजपचे (BJP) धोरण असल्याचे समजते. गृह खाते मिळावे यासाठी फडणवीस आग्रही आहेत. तर हे खाते यावेळी त्यांच्याऐवजी भाजपच्या दुसर्‍या वरिष्ठ नेत्याकडे देण्यावर अमित शाह (Amit Shah) यांचा भर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Eknath Shinde Devendra Fadnvais Government)

 

चंद्रकांत पाटील यांचे नाव गृहमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याची माहीती आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या प्रस्तावित संघटनात्मक बदलामध्ये प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा नेमला जाण्याचीही शक्यता आहे.

शिंदे गटाने 10 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदांची मागणी केली आहे. तर भाजपला 28 मंत्रिपदे देण्याचे या बैठकीत ठरल्याचे समजते. शिंदे गटाला कोणती खाती द्यायची यावरही चर्चा झाल्याचे समजते. गृहखाते फडणवीस यांच्याकडेच राहणार यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप भाजपमधून कोणीही यास दुजोरा दिलेला नाही.

 

शहा यांच्यासोबत चार तास चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस आज भाजपच्या नेत्यांना दोन टप्प्यात भेटणार आहेत.
पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतील.
दुसर्‍या टप्प्यात शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतील.

 

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून मुख्यमंत्री शिंदे दुसर्‍या दिवसाच्या दौर्‍याला सुरूवात करणार आहेत.
दिल्ली दौरा आटोपल्यावर आज सायंकाळीच मुख्यमंत्री खासगी विमानाने थेट पुण्यात येतील.
येथून ते पुढे पंढरपूर येथील शासकिय पुजेसाठी जाणार आहेत.

 

Web Title :- Eknath Shinde Devendra Fadnvais Government | CM eknath shinde Dycm devendra fadnavis home minister delhi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा