Eknath Shinde Group | ‘मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या लोकांना शिंदे गटात प्रवेश नको’; दीपाली सय्यद यांच्या प्रवेशावरून भाजपच्या महिला आघाडीची मागणी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – आक्रमकपणे ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या दीपाली सय्यद (Dipali Sayyad) यांचे मत परिवर्तन झाले असून त्या लवकरच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) सामील होणार आहेत. रविवार ठाण्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उपस्थितीत दीपाली सय्यद शिंदे गटात (Eknath Shinde Group) सहभागी होतील. पण ही बाब भाजपच्या (BJP) पचनी पडता दिसत नाही.

 

भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसेनी (BJP leader Mrunal Deshpande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shine) गटासमोर दीपाली सय्यद यांना एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपाची माफी मागितली तरच दीपाली सय्यद यांना एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) प्रवेश द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दीपाली सय्यद यांनी अत्यंत घाण शब्दात नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली, असे मृणाल पेंडसेंचे म्हणणे आहे.

 

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या व्यक्तींना शिंदे गटात खरंतर प्रवेश देऊ नये. आम्ही महिला आघाडीच्यावतीने दीपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाचा जाहीर विरोध करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांचा आदर करतात. पण कोणतीही विचारधारा नसलेल्या, आपली मतं सातत्याने बदलणाऱ्या, तसेच कुठलीही पात्रता नसलेली दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे कळाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यं केली होती. आमच्या दोन्ही नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या दीपाली सय्यद यांना आमचा विरोध आहे, असे मृणाल पेंडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता दीपाली सय्यद आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार, हे महत्वाचे ठरते.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह (Amit Shah) यांनी स्मशानात जा, महागाई कमी करता येत नसेल
तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या, या प्रकारची वक्तव्य दिली सय्यद यांनी केली होती.
शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गादीवर हल्ला केला होता तेव्हा सुद्धा दीपाली सय्यद यांनी नरेंद्र मोदींना मध्ये ओढले होते.

 

Web Title :- Eknath Shinde Group | bjp opposes deepali sayyad told eknath shinde dont give her entry in shinde camp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T20 World Cup | पाकिस्तानच्या PM ने केलेल्या ट्विटवर इरफानचे सडेतोड उत्तर, म्हणाला ” तुमच्यात आणि आमच्यात….”

Uddhav Thackeray | नाशकात ठाकरे गटात घरवापसी सत्र सुरु

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘अनेक विकासकामे केली त्यामुळे विरोधकांना…’