Eknath Shinde | महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार?; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याने केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Eknath Shinde | नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये (Election) भाजपला (BJP) चार राज्यात घवघवीत यश मिळालं आहे. भाजप आता महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटसचा (Operation Lotus) वापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करणार. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) सरकार केव्हाही पडू शकतं, असा दावा काँग्रसचे खासदार कुमार केतकर (Congress MP Kumar Ketkar) यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे नगरसविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत रोखठोक मत मांडलं आहे.

 

राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule) लागण्याचं कारण काय?, आमच्याकडे 170 चं बहुमत आहे. लोकशाहीमध्ये बहुमताच्या आकड्याला महत्त्व असतं. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट कोणत्या कारणामुळे लावता येईल?, असा सवाल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे.

 

कोरोनाच्या (Corona) काळाचा सामना आपण समर्थपणे केला आहे. इतर बाकी राज्यांनी आपलं अनुकरण केलं होतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वात शेतकरी (Farmer) आणि कष्टकरी यांना न्याय देण्याचं काम सरकार करत आहे. राज्याने आज सादर केलेला अर्थसंकल्प (Budget) हा सर्वसमावेशक आणि बहुमताचं सरकार असताना राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं कारण काय?, असा सवाल एकनाथ शिंदेनी केला आहे. त्यासोबतच भाजप महापालिकेच्या निवडणुकीत (Municipal Elections Maharashtra) सरकारला टार्गेट करणार त्याचं कशाप्रकारे उत्तर देणार?, यावर शिंदेंनी आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजप टार्गेट करणार म्हणजे नेमकं काय करणार?, सरकार येत असतं आणि जात असतं.
भ्रष्टाचार करणाऱ्यांवर केंद्रीय यंत्रणांनी (Central System) कारवाई केली पाहिजे
मात्र सुडबुद्धीने केंद्रीय यंत्रणेचा वापर करणं लोकशाहीला (Democracy) मारक असल्याचं शिंदे म्हणाले.

 

Web Title :- Eknath Shinde | Shivsena leader and minister eknath shinde reply to congress mp kumar ketkar over statement about president rule in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | गोव्यातील यशानंतर देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेला ओपन ‘चॅलेंज’; म्हणाले – ‘लढाई संपलेली नाही, खरी लढाई मुंबईत होणार’

 

Sharad Pawar | शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं, कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा?

 

Hruta Durgule | ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री ठरली सर्वाधिक फॉलोवर्स असणारी पहिली मराठी अभिनेत्री..