नागपूरात वृद्ध दाम्पत्याच्या हत्येने खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर येथील सुरक्षानगर मधील वृद्ध दाम्पत्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन त्यांची हत्या करण्याची घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. शंकर चंपाती (वय ७०) आणि त्यांची पत्नी सीमा चंपाती (वय ६०) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार चोरीच्या उद्देशाने चोरट्याने घरात शिरुन त्यांची हत्या केल्याचा अंदाज आहे.

वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरक्षानगर येथे चंपाती हे राहतात. त्यांचा दत्तवाडी चौकात नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय असून त्यांची पत्नी सीमा गृहिणी आहे. त्यांची मुलगी प्रियंका चंपाती ही खासगी नोकरी करते. प्रियंका रविवारी रात्री आठ वाजता बाहेरुन घरी आली. तेव्हा आईवडिल रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे तिला आढळून आले.

चंपाती दाम्पत्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे दिसून येत होते. घरफोडी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी हा हल्ला केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी शंकर यांचा अपघात झाल्याने ते जखमी झाले होते. त्यामुळे ते घरीच राहायचे. त्यावेळी एकाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची तक्रार वाडी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची (एन सी) नोंद केली होती. त्यांच्या हत्येमागे त्या व्यक्तीचा तर हात नाही ना, यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like