काँग्रेसला निवडणूक आयोगाचा झटका ; ‘चौकीदार चोर है’ या जाहीरातीवर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्ष करत असून आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदानाची तारीख जसजसी जवळ येत आहे तसतसे राजकीय पक्ष अधिक आक्रमक होत आहेत. भाजपने मतदारांना प्रभावित करण्यासाठी ‘मै भी चौकीदार’ गाणे आणले. यामध्ये भाजपाची निती दाखवण्यात आली. यानंतर याला प्रत्युत्तर देण्यासाठी कांग्रेसने ‘चौकीदार चोर है’ हे कॅम्पेनिंग करण्यास सुरुवात केली. पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे ‘चौकीदार चोर है’ जाहीरात आणि व्हिडीओवर बंदी आणली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचार अभियानाला जोरदार झटका लागला आहे.

‘चौकीदार चोर है’ या जाहीरात आणि व्हिडीओवर बंदी आणण्याचे निर्देश मुख्य निर्वाचन पदाधिकारी कार्यालयाने भोपाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. काँग्रेसच्या प्रचार अभीयानात हा जोरदार झटका मानला जात आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे या जाहीराती संदर्भात तक्रार केली होती. काँग्रेसच्या जाहीरातीवर बंदी घालावी असे राज्यस्तरीय मीडिया प्रमाणन म्हणजे अनुरीक्षण समितीने म्हटले आहे.

‘चौकीदार चोर है’ हे कॅम्पेन काँग्रेसतर्फे चालवण्यात येत आहे. पण या विधानामुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. चौकीदार चोर है या विधानाचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्याकडे मागितले आहे. भाजपा खासदार मीनाक्षी लेखींच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. राफेल करारात अंबानींच्या कंपनीसोबत करार करण्यात पंतप्रधानांचा पुढाकार होता. हे सर्व नियमबाह्य आणि हेतुपूर्वक पद्धतीने केल्याचा आरोप काँग्रस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता.

You might also like