#Video : पत्नीचा प्रचार करणाऱ्या अनुपम खेर यांची फजिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेते अनुपम खेर यांची आपल्या पत्नी आणि भाजप उमेदवार किरण खेर यांचा प्रचार करत असताना चांगलीच फजिती उडाली. प्रचारादरम्यान एका दुकानदाराने त्यांना भाजपचा २०१४ चा जाहीरनामा दाखवत भाजपच्या मागील आश्वासनांबद्दल विचारले. मात्र अनुपम खेर यांनी यावर काहीही प्रतिक्रिया न देता तिथून जाणे पसंत केले. त्यांच्या पत्नी किरण खेर या चंदीगडमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

यावेळी प्रचार करण्यासाठी अनुपम खेर तेथील एका दुकानात गेले असता, तेथील दुकानदाराच्या प्रतिक्रियेमुळे ते गोंधळले. दुकानदाराच्या हातात भाजपचा २०१४ चा जाहीरनामा होता. तो दाखवत त्याने प्रश्न विचारले कि, मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले..? यापैकी तुम्ही काय केले. मात्र याला अनुपम खेर यांनी काहीही उत्तर दिले नाही आणि हाथ जोडून ते पुढे निघून गेले. या सगळ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावर अनुपम खेर यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे कि विरोधकांनी दोन माणसे त्या दुकानात दोन माणसं उभी केली होती जे कि मोबाईलवर या सगळ्याचा व्हिडीओ बनवत होते आणि त्यांनी हा व्हिडीओ जाहीर केला.

दरम्यान अनुपम खेर यांची फजिती होण्याची हि काही पहिलीच वेळ नाही. मंगळवारी देखील पत्नीच्या प्रचारासाठी आयोजित सभेला ते संबोधित करणार होते, मात्र गर्दी नसल्याने त्यांची ती सभा रद्द करावी लागली होती.