Election of Assembly Speaker । विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आघाडीत मतभिन्नता; ‘वर्षा’वर मंत्र्यांची बैठक

मुंबई (Mumbai) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Election of Assembly Speaker । मागील काही महिन्यापासून विधानसभा अध्यक्ष (Election of Assembly Speaker) निवड आणि राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य या दोन मुद्यावर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी सुरु आहे. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

Gopichand Padalkar Allegations against NCP | राष्ट्रवादी मुद्यावरुन गुद्यावर आली, गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

Election of Assembly Speaker । rounds of meeting have statred at varsha bungalow before monsoon assembly session

त्यानंतर अद्यापही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. तर आता येत्या 5 जुलैपासून होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष (Election of Assembly Speaker) निवड व्हावी यावरून काँग्रेस पक्ष आग्रही आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात मतभिन्नता असल्याचं समोर आलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत बुधवारी (30 जून) रोजी रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी अध्यक्ष पदाच्या निवडीवरून वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समोर आले आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या परिस्थितीत अधिवेशन दोन दिवसांचे होईल. अधिवेशना पूर्वी आमदारांची कोव्हिड टेस्ट आवश्यक असणार आहे. म्हणून विधानसभा अध्यक्षांची निवड पुढे ढकलता येईल अथवा कसे, यावर देखील चर्चा करण्यात आलीय.

Pune Municipal Corporation News | नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील कागदपत्रे ताब्यात घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
‘मुंबईत होणाऱ्या 2 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात नवीन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असं काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार देखील केला आहे.

Gopichand Padalkar Allegations against NCP | राष्ट्रवादी मुद्यावरुन गुद्यावर आली, गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

नवाब मलिक म्हणाले..
‘राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांचे करोना टेस्ट रिपोर्ट उपलब्ध झाल्यानंतर नवीन विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निर्णय होईल. आम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा अधिक मताने जिंकू, असा विश्वास देखील राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी बैठकीदरम्यान केला आहे.

तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करावी असे सूचित करीत आहेत. परंतु,, विधान परिषदेच्या 12 जागा रिक्त आहेत. तो पण विषय प्रलंबित आहे. राज्यपालांनी हा विषय निकाली काढला, तर विधानपरिषदेच्या सभागृहातील 12 आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील. आमचा आग्रह वारंवार राहिला आहे, याची आठवण देखील नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्यपालांना यावेळी करून दिलीय.

नाना पटोले काय म्हणाले?
दरम्यान, ‘पावसाळी अधिवेशनात विधानसभा (monsoon assembly session) अध्यक्षाची
निवडणूक व्हावी, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना दिल्या
आहेत. तर, राज्यपालांना 12 नामनिर्देश आमदारांबाबत दिलेल्या पत्राचे काय झाले? असा प्रश्न
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावरील
व्यक्तींनी पदाचा सन्मान राखणे आवश्यक आहे, पण राज्यपालांना त्याचा विसर पडला आहे, असा
चिमटा नाना पटोले (Nana Patole) यांनी काढला आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Election of Assembly Speaker । rounds of meeting have statred at varsha bungalow before monsoon assembly session

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update