Gopichand Padalkar Allegations against NCP | राष्ट्रवादी मुद्यावरुन गुद्यावर आली, गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

सोलापूर (solapur) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar)यांच्या कारवर बुधवारी (दि.30 जून) सोलापूर (Solapur) येथे दगडफेक (Stone Outrage) करण्यात आली होती. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे राज्यभरात घोंगडी बैठका घेत आहे. काल सोलापूरमध्ये (Solapur) घोंगडी बैठका घेण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी त्यांच्या कारवर एका युवाकने दगडफेक केली असून तो युवक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादीचा (NCP) खरा चेहरा जनेतेसमोर आला आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी मुद्यावरुन गुद्यावर आली आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. (BJP MLA Gopichand Padalkar Allegations against NCP)

Gopichand Padalkar Allegations against NCP

त्यामुळे राष्ट्रवादी मुद्यावरुन गुद्यावर

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काल सोलापूरमध्ये दगडफेक झाली. या घटनेनंतर आज (गुरुवार) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सोलापूर शासकीय विश्रामगृहात (Solapur Government Rest House) बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीकास्त्र सोडले. मागील वर्षभरात घडलेल्या घडामोडी राज्यातील बहुसंख्य बहुजनांवर अन्याय करणाऱ्या आहेत. त्याच्या विरोधात मी जाहीरपणे आवाज उठवत आहे. ओबीसीचं (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं. अजित पवारांमुळे (Ajit Pawar) पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण (backward class employees reservation in promotion) गेलं. यामुळे बैठकांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे राष्ट्रवादी (NCP) तळातून हललेली आहे. लोक जागे होत आहेत हे राष्ट्रवादीला पटत नाही, त्यामुळे राष्ट्रवादी मुद्यावरुन गुद्यावर गेली असल्याची टीका पडळकर यांनी केली.

हा उपेक्षितांच्या डोक्यात मारलेला दगड

पडळकर पुढे म्हणाले, या घटनेमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांनी पडळकराच्या गाडीवर दगड मारलेला नाही, त राज्यातील उपेक्षित पीडितांच्या डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हा दगड उलटून राष्ट्रवादीच्याच (NCP) डोक्यावरती पडणार असल्याचे पडळकर यांनी म्हटले. राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी मी स्टंट केला असा आरोप केला. परंतु त्यांनी हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणलं आहे. आमच्या कार्यक्रमात रोहित पवारांचा (Rohit Pawar) टी-शर्ट घातलेले कार्यकर्ते उपस्थित होते, असा खुलासा पडळकर यांनी केला.

हे देखील वाचा

Samruddha Jeevan | ‘समृध्द जीवन’च्या आंबेगाव पठार येथील फ्लॅटवर छापा; सीआयडीकडून महत्वाची जप्त

Assembly Speaker | विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत नितीन राऊत तर प्रणिती शिदेंना मंत्रिपद?

Sambhaji Bhide । संभाजी भिडेंचं वक्तव्य, म्हणाले – ‘आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्याने कोरोना वाढतोय

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gopichand Padalkar Allegations against NCP

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update