दौंड तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

दौंड : अब्बास शेख

दौंड तालुक्यातील रोटी, वासुंदे, देऊळगाव राजे, नाथाचीवाडी या चार ग्रामपंचायतींची निवडणुक झाली. त्याच पार्श्वभूमीवर आज दौंड तहसीलदार कचेरी येथे मतमोजणी झाली. यामुळे निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

रोटी गावात सरपंच पदासाठी दोन उमेदवारांत थेट लढत झाली. रोटी गावच्या सरपंच पदी दिलीप नारायण शितोळे यांची निवड झाली त्यांना ४६० मते मिळाली. त्यांनी विरोधी पॅनेलचे उमेदवार शहाजी शितोळे (३९६ मते) यांचा पराभव केला . वासुंदे गावात सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. सरपंच पदासाठी थेट लढत निलेश भोईटे (६६४ मते ) विरूद्ध दत्तात्रय लोंढे (५७६ मते ) यांच्यात झाली. या लढतीत निलेश भोईटे यांनी विजय मिळवला.

देऊळगाव राजे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी तिन महिला उमेदवार रिंगणात होत्या. यात सरपंच पदासाठी स्वाती अमित गिरमकर यांनी ९९६ मते मिळवून विजय मिळवला आहे. तर त्यांच्या विरोधी उमेदवार सुभद्रा अर्जुन गिरमकर यांना ७०४ मते तर सारिका सतिश आवचर यांना ५१३ मते मिळाली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d5392c67-c256-11e8-9a64-cfbeeed0911c’]
नाथाचीवाडी येथे सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत सारिका अनिल चोरमले यांनी ११५८ मते मिळवून विजय मिळवला आहे. तर त्यांच्या विरोधी उमेदवार विद्या दिगंंबर ठोंबरे यांना ७७२ मते मिळाली. निवडणुक निकालानंतर विजयी उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
[amazon_link asins=’B076BF2D4Z,B07BVV2W18′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e37483ac-c256-11e8-bf4b-8586a0d30fb6′]