अवघ्या 7 रुपये खर्चात 100 KM पर्यंत धावणार ही बाईक, किंमत 50 हजार

ADV

हैद्राबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –   जर तुम्ही महागड्या पेट्रोलमुळे त्रस्त झाला असाल तर, तर ही नवीन बाईक खरेदी करू शकता. ही इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार्‍या कंपनीचा दावा आहे की, अवघ्या 7 ते 10 रुपये खर्चात बाईक 100 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते.

लो-स्पीड इलेक्ट्रिक बाईक

ADV

हैद्राबादची इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी अ‍ॅट्यूमोबाईल प्रायव्हेट लिमिटेडने ही बाईक बाजारात आणली आहे. कंपनीने बाईक अ‍ॅट्यूम 1.0 नावाने आणली आहे. अ‍ॅट्यूम 1.0 इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलजी (आयसीएटी) द्वारे मान्यता प्राप्त लो-स्पीड इलेक्ट्रिक बाईक आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही

या बाईकची सर्वात मोठी खासीयत म्हणजे ही चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही. सोबतच ती खरेदी करण्यासाठी रजिस्ट्रेशनची सुद्धा गरज भासत नाही. म्हणजे ग्राहकाला केवळ एकदा बाईकची किंमत चुकवावी लागेल.

बॅटरीवर दोन वर्षांची वॉरंटी

अ‍ॅट्यूम 1.0 इलेक्ट्रिक बाईकमध्ये पोर्टेबल लिथियम-आयर्न बॅटरी दिली आहे, हिची बॅटरी 4 तासात फुल चार्ज होते. कंपनीनुसार फुल चार्ज केल्यानंतर ही बाईक 100 किलोमीटरपर्यंत चालते. कंपनी बॅटरीवर दोन वर्षांची वॉरंटीसुद्धा देत आहेत.

स्वस्त बाईक

कंपनीचा दावा आहे की, अ‍ॅट्यूम 1.0ची बॅटरी एकदा फुल चार्ज होण्यासाठी सुमारे 1 युनिट वीज लागते. 7-10 रुपयांच्या खर्चात 100 किलोमीटर बाईक चालते. अ‍ॅट्यूम 1.0 इलेक्ट्रिक बाईकची किंमत 50 हजार रुपये आहे.

नॉर्मल थ्री-पिन सॉकेटने करा चार्ज

सर्वात सोपी गोष्ट ही आहे की, हिची बॅटरी नॉर्मल थ्री-पिन सॉकेटद्वारे कुठेही चार्ज करू शकता. ही बाईक अनेक रंगात उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक बाईकमध्ये 20 बाय 4 फॅट-बाईक टायर दिला आहे. तसेच लो सीट हाइट, एलईडी हेडलाईट, इंडीकेटर्स, टेललाईट आणि फुली डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे.

कंपनीला या बाईककडून मोठी अपेक्षा

अ‍ॅट्यूम 1.0 इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती कंपनीच्या तेलंगना येथील ग्रीनफील्ड मॅन्युफॅक्चरिंग प्लँटमध्ये करण्यात आली आहे. या प्लँटची प्रॉडक्शन कॅपसिटी 15,000 युनिट आहे, जी वाढवून 25,000 युनिट केली जाऊ शकते.