Coronavirus : मनपातील अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांसाठी मोफत बस सेवा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महापालिकेतंर्गत अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांसाठी पीएमपीएलकडून मोफत बस सेवा देण्यात येणार आहे. दररोज सकाळी साडे आठ ते साडे दहा आणि सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत दर 30 मिनिटांनी मोफत सेवा देणार आहे आहे. कर्मचार्‍यांचे ओळखपत्र तपासूनच बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात खासगी वाहतूक अत्यावश्यक सेवा वगळता बंद केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍यांना पृवास करता येत नाही. त्यापार्श्वभूमीवर पीएमपीएलने कात्रज, बालेवाडी, पुणे स्थानक, हडपसर, न ता वाडी आणि स्वारगेट या सहा स्थानकातून बस सोडण्यात येणार आहे. सध्या नागरिकांसाठी अग्निशमन, पोलीस, स्वच्छता, आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. अशा कर्मचार्‍याने बससेवा उपलब्ध करून देणार आहे.

कात्रज येथून सुटणारी बस स्वारगेट, बाजीराव रस्ता, मनपा, सिमला ऑफिस, आरटीओ, नायडू रुग्णालयात, पुणे स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, शनिवारवाडा मंडई स्वारगेट परत कात्रज या मार्गावरील कर्मचार्‍यांना आहे. औंध ते डेक्कन, विमाननगर ते मनपा, भेकराई नगर ते मनपा, विश्रांतवाडी ते मनपा, नांदेड सिटी ते डेक्कन अशी पीएमपीची सेवा असणार आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.