महावितरण कंपनी प्रशासनाच्या विरोधात कर्मचाऱ्यांचा निषेध

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – सानुग्रह अनुदान व थकबाकीचा दुसरा हप्ता या मागणी करिता महावितरण कंपनीच्या प्रशासनाच्या विरोधात लासलगाव उपविभाग संयुक्त कृती समिती तर्फे निषेध करण्यात आला.

दिनांक १२ लासलगाव उप विभाग संयुक्त कृती समिती यांच्या वतीने जाहीर निषेध सभा घेण्यात आली. सानुग्रह अनुदान व थकबाकीचा दुसरा हप्ता देण्यात प्रशासन टाळाटाळा करीत आहे, तसेच समितीच्या वतीने सदर मागण्या मान्य न झाल्यास दिनांक १४ नोव्हेंबर रोजी संप करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी रोशन धनवीज, राजपूत, पाटील, दिनेश जोशी, अभिजित घुगे, रमेश साळवे, शिवाजी मोरे, प्राकाश वल्टे, दिनेश शिंदे, राजाराम सोनवणे, महिंद्र राहटल, मानिक शिंदे, संदीप खडगी, किरण गांगुर्डे, नितीन शिंदे, प्रतीक घुमरे, केदारे,जाधव, कांबळे,  बुरकुल व इतर कर्मचारी उपस्थित होते.