30 हजार रुपयांपर्यंत सॅलरी असणार्‍यांसाठी मोदी सरकार करू शकतं मोठी घोषणा, मिळतील अनेक फायदे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार नोकरदारांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. सीएनबीसी आवाजने सूत्रांच्या संदर्भाने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच 21,000 रुपयांपेक्षा जास्त सॅलरी असली तरी ईएसआयसीचा फायदा मिळू शकतो. कोरोना संकटात जास्तीतजास्त कर्मचार्‍यांना दिलासा देण्यासाठी ईएसआयसीच्या नियमात बदल करण्याची तयारी सुरू आहे. या अंतर्गत मेडिकल आणि आर्थिक मदतीचे नियम बदलले जातील. यासाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार 21,000 पेक्षा जास्त सॅलरी असेल तरीसुद्धा सुविधा मिळतील. 30,000 रुपयांपर्यंत सॅलरीवाल्यांना सुद्धा ईएसआयसीचा फायदा मिळेल.

नियमांसाठी तयारी सुरू
कामगार मंत्रालयाने नियमांमध्ये बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. जास्त सॅलरीवाल्यांना योजनेशी जोडण्याचा पर्याय असेल. बेरोजगार झाल्यास आर्थिक मदत ठरलेल्या हिशेबाने होईल. ईएसआयसी बोर्डला लवकर हा प्रस्ताव पाठवण्यात येईल.

21 हजार रुपयांपर्यंत सॅलरीवाल्यांसाठी उचललेली पावले
केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी मागच्या आठवड्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) अटल विमीत व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत बेरोजगारी लाभाच्या दाव्यासाठीचा अर्ज 15 दिवसांच्या आत निकाली काढायचा आहे. ईएसआयसीच्या संचालक मंडळाने कोरोना व्हायरस महामारी पाहता रोजगार गमावणार्‍या लोकांना दिलासा देण्यासाठी या वर्षी 24 मार्च ते 31 डिसेंबरपर्यंतसाठी बेरोजगारी लाभांतर्गत दुप्पट मदत करण्यात आली आहे. आता तीन महिन्याच्या सरासरी वेतनाच्या पन्नास टक्के लाभ दिला जाईल.

आता रोजगार गेल्यानंतर 30 दिवसानंतर लाभाचा दावा करता येईल. पूर्वी ही मर्यादा 90 दिवसांची होती. आता कर्मचारी स्वता दावा करू शकतात. गंगवार ईएसआयसी बोर्डाचे अध्यक्षही आहेत. योजनेच्या कक्षेत येणार्‍या सर्व लोकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन गंगवाल यांनी केले आहे. ईएसआयसी बोर्डाने गुरूवारच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा सुमोर 40 लाख कामगारांना लाभ होण्याची शक्यता आहे.